शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

पाणी टंचाई काळात वृक्ष जगविण्यासाठी पोलिसांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 2:53 PM

मानवाप्रमाणेच वृक्षांनाही पाण्याची गरज लक्षात घेता आसेगाव पोलीसांच्यावतिने टँकरव्दारे पाणी आणून वृक्ष वाचविण्याचा संकल्प केला आहे.

ठळक मुद्देजून २०१७ मध्ये  लावलेले १५० वृक्ष मागील चार महिन्यापासून टँकरने पाणी आणून भिषण पाणी टंचाईतही हे वृक्ष  जगविण्याचे काम आसेगाव पोलिस करीत आहेत.  पिण्याचे पाणी मिळणे कठीण झाल्याने हे १५० वृक्ष कसे जगवायचे असा प्रश्न ठाणेदार विनायक जाधव यांना पडला . ही वृक्ष ज्या उत्साहाने व उदेशाने आपण लावलीत त्याच उत्साहाने व उदेशाने जगायला पाहीजे असा संकल्प त्यानंी केला .

वाशिम  :  सर्वत्र पाणी टंचाईन हाहाकार माजविला आहे, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. अशाही परिस्थितीत मानवाप्रमाणेच वृक्षांनाही पाण्याची गरज लक्षात घेता आसेगाव पोलीसांच्यावतिने टँकरव्दारे पाणी आणून वृक्ष वाचविण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.  पाणी टंचाईतही वृक्ष पाण्यामुळे मरू देणार नाही असा संकल्प ठाणेदार विनायक जाधव यांच्यासह पोलीसांनी घेतला आहे. यामुळे सर्व पोलीस स्टेशनचा परिसर उन्हाळयातही हिरवागार दिसून येत आहे.

 गतवर्षी जून २०१७ मध्ये  लावलेले १५० वृक्ष मागील चार महिन्यापासून टँकरने पाणी आणून भिषण पाणी टंचाईतही हे वृक्ष  जगविण्याचे काम आसेगाव पोलिस करीत आहेत.  गतवर्षी जून मध्ये आसेगाव पो.स्टे.मघ्ये १५० विविध जातीचे वृक्ष लावण्यात आले, परंतु मागील चार महिन्यापासून आसेगाव येथे पाणी  टंचाई  असल्याने पिण्याचे पाणी मिळणे कठीण झाल्याने हे १५० वृक्ष कसे जगवायचे असा प्रश्न ठाणेदार विनायक जाधव यांना पडला . यावर ही वृक्ष ज्या उत्साहाने व उदेशाने आपण लावलीत त्याच उत्साहाने व उदेशाने जगायला पाहीजे असा संकल्प त्यानंी केला .स्वखर्चाने ५०० रुपये प्रती टँकरने पाणी विकत घेवनू ते स्वत वृक्षाला पाणी देवून वृक्षांचे संवर्धन करतांना दिसून येत आहेत. याकामी त्यांना पोलीस कर्मचाºयांचेही मोलाचे सहकार्य लाभत आहेत्.  माह मे आणि जून मध्ये ही झाडे जगली की ही वृक्ष स्वत:च्या भरोषावर जगतात असा ठाणेदार विनायक जाधवचा विश्वास आहे. 

 

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या ओवीव्दारे आपण त्यांचे संगोपन करीत आहे. आपण पाण्याशिवाय जगू शकत नाही तर अबोल झाडे कसे जगू शकतील. निसर्गाचा समतोल राखावयाचा असेल तर प्रत्येकाने वृक्षसंवर्धन करणे गरजेचे आहे. 

- विनायक जाधव, ठाणेदार, आसेगाव

टॅग्स :washimवाशिमPolice Stationपोलीस ठाणे