शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी पकडला तांदळाचा अवैध साठा, तांदूळ आणि चार वाहनांसह १६ लाख ५९ हजारांचा ऐवज जप्त

By दादाराव गायकवाड | Updated: September 29, 2022 17:05 IST

Crime News: काळ्या बाजारात विक्रीसाठी अवैधरित्या साठवून ठेवलेला ९५ हजार २२० रुपये किमतीचा तांदूळ आणि चार वाहनांसह एकूण १६ लाख ५९ हजार २२० रुपयांचा ऐवज स्थानिक गुन्हे शाखा वाशिमच्या पथकाने कारंजा पोलिसांच्या हद्दीतील काेळी येथून जप्त केला

- दादाराव गायकवाड

वाशिम - काळ्या बाजारात विक्रीसाठी अवैधरित्या साठवून ठेवलेला ९५ हजार २२० रुपये किमतीचा तांदूळ आणि चार वाहनांसह एकूण १६ लाख ५९ हजार २२० रुपयांचा ऐवज स्थानिक गुन्हे शाखा वाशिमच्या पथकाने कारंजा पोलिसांच्या हद्दीतील काेळी येथून जप्त केला असून, तांदळासह वाहने कारंजा शहर पोलीस स्टेशनमध्ये २९ सप्टेंबर रोजी जमा करण्यात आली आहेत.

प्राप्त माहितीनुसार वाशिम गुन्हे शाखेचे पोलीस कारंजा शहर पोलिसांच्या हद्दीत २८ स्प्टेंबर रोजी रात्री पेट्रोलिंग करीत असताना २ वाजताच्या सुमारास कोळी येथील भागात अमिर मदार गुगीवाले (वय ३२ वर्षे) रा. कोळी याने त्याच्या ताब्यात शासकीय स्वस्त धान्य दुकानात वितरीत करण्यात येणारा तांदळाचा अवैधरित्या विना परवाना साठा करून ठेवला आहे. यावरून पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोन पंचासमक्ष पाहणी केली असता तेथे दोन मोठ्या आणि दोन लघू मालवाहू वाहनांत तांदळाचे प्रत्येकी ७० किलो वजनाचे ९५ हजार २२० रुपये किमतीचे ७९ कट्टे आढळले. चौकशी करून आरोपीकडे कागदपत्रांची मागणी केली असता त्याच्याकडे कोणतीही कागदपत्रे वा शासनाने जारी केलेला परवाना आढळून आला नाही. त्यामुळे पोलिसांनी १५ लाख ६४ हजार रुपये किमतीची चार वाहने आणि ७९ कट्टे तांदूळ मिळून एकूण १६ लाख ५९ हजार २२० रुपये किमतीचा ऐवज जप्त करीत कारंजा शहर पोलीस स्टेशनमध्ये जमा केला आहे. या प्रकरणी संबंधिताने माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचे पोलिसांनी सांगितले.तहसीलदारांना दिले पत्रवाशिम गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडलेल्या अवैध तांदळाच्या घटनेबाबत कारंजाचे तहसीलदार धीरज मांजरे यांना पत्र सादर करून माहिती दिली असून, पकडलेला तांदूळ सार्वजनिक वितरण प्रणालीतील आहे किंवा नाही, याची चौकशी करून तांदळाचा अवैध साठा करणारा इसम अमिर मदार गुगीवाले याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwashimवाशिम