शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

युवक-युवतींना पोलीस भरतीपूर्व मोफत प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 14:20 IST

वाशिम : सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाºया अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील युवक-युवतींना पोलीस भरतीपूर्व मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाºया अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील युवक-युवतींना पोलीस भरतीपूर्व मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याकरिता १० जून २०१९ रोजी वाशिम येथे शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाणार आहे. इच्छुक युवक, युवतींनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.१८ ते २५ वर्षे वयोगटातील इच्छुक युवक-युवतींना या प्रशिक्षणामध्ये सहभागी होता येईल. याकरिता पुरुष उमेदवारांची छाती ७८ ते ८३ से.मी. असणे आवश्यक आहे, तसेच उंची किमान १६५ से.मी. असावी. महिलांची उंची किमान १५५ से.मी. असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी १२ वी पास गुणपत्र, रहिवासी दाखला, अधिवास प्रमाणपत्र, जातीचा दाखला, सेवायोजन नोंदणी प्रमाणपत्र व पासपोर्ट आकाराची दोन छायाचित्रे सोबत आणणे आवश्यक आहे. निवड झालेल्या युवक-युवतींना अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे तीन महिन्याच्या कालावधीचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाबाबतच्या सोयी-सुविधा शासनामार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे केदार यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिसpolice parade groundपोलिस कवायत मैदान