शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जेवणाच्या नावाखाली चेकपोस्टवरील पोलीसांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 11:11 IST

शेलुबाजार रस्त्यावर असलेल्या चेकपोस्टवर जेवणाच्या नावाखाली कर्मचारीच दांडी मारत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार चेकपोस्टवर प्रत्येक वाहनाची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याकरिता चेकपोस्टवर तीन पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. परंतु वाशिम येथील शेलुबाजार रस्त्यावर असलेल्या चेकपोस्टवर जेवणाच्या नावाखाली कर्मचारीच दांडी मारत असून एका पोलीस शिपायास ठेवून स्वताचे कामे उरकत असल्याचे लोकमतने १५ व १६ जुलै रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनवरुन उघडकीस आले. कर्तव्यावर असलेला पोलीस कर्मचारीही त्याच्या समोरुन परजिल्हयातील वाहने जात असताना , साधी विचारपूस करीत नसल्याचे या दरम्यान दिसून आले.चेकपोस्टवर हजर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास यासंदर्भात विचारणा केली असता चेकपोस्टवर तिघांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगितले. बुधवारी ३.१५ मिनिटांनी इतर अधिकारी , कर्मचारी कुठे आहेत याची विचारणा केली असता जेवायला गेल्याचे सांगितले. परजिल्हयातील अकोला येथील वाहन (एम.एच.३० पासिंग असलेले) पोलीस कर्मचाऱ्यासमोरुन जात असतांना सुध्दा त्या वाहनाला थांबविण्यात आले नाहीत. शिवाय मोटारसायकलस्वार तर चक्क डबल , तिबल सिट समोरुन जात असतांना त्यांच्याकडे पाहले सुध्दा नाही. अनेकजण विना मास्क जाताना दिसून आले. याबाबत सदर कर्मचाऱ्यास विचारणा केली तर ‘किती समजून सांगावे... कोणी ऐकत नाही’ असे म्हणून बिनधास्त वाहने जावू दिलीत. यावरुन जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या जिल्हा कडक बंदीच्या आदेशाला पोलीस कर्मचाऱ्यांच्यावतिने ‘खो’ दिल्या जात असल्याचे दिसून येत आहे.

असे केले स्टिंग ऑपरेशनपरजिल्हयातील कोणतेच वाहन शहरात येवू नये यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये जिल्हयात जिल्हयाच्या सिमेवर चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. या चेकपोस्टवर कोणत्याच वाहनांची तपासणी केल्या जात नसल्याच्या माहितीवरुन लोकमतच्यावतिने १५ व १६ जुलै रोजी स्टिंग आॅपरेशन केले. अकोला रस्त्यावरील तसेच वाशिम ते मंगरुळपीर मार्गावरील शेलुबाजार रस्त्यावरील चेक पोस्टवर छायाचित्र काढेपर्यंत कोणीच नव्हते. छायाचित्र काढून झाल्यानंतर एक पोलीस कर्मचारी आला, तेव्हा अनेक वाहने विना तपासणी निघून गेले होते. पोलीस कर्मचारी आल्यानंतरही समोरुन वाहने जात असतांना वाहनांची तपासणी केल्याचे दिसून आले नाही.

शहरात बिनधास्त शिरताहेत जिल्हा बाहेरील वाहनेवाशिम शहरात जिल्हाबाहेरील येणाºया वाहनांना कोणीही अटकाव करीत नसल्याने बिनधास्त वाहने शहरात येताना दिसून येत आहेत.बागवान पुरा येथे झालेल्या घटनेतील आरोपी मोठया संख्येत असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रीयेमुळे चेकपोस्टवरील काही कर्मचाऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलाविण्यात आले होते. त्यावेळी ते कदाचित गैरहजर आढळले असावेत. दररोज चेक पोस्टवर नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी हजर असतात. विशेष म्हणजे मी स्वत: पेट्रोलिंग करतांना आढळून येतात.- योगीता भारव्दाज, ठाणेदार , वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिस