शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी बुजविले राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 18:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमेडशी: गत काही दिवसांपासून अकोला- वाशिम राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत आहे. पुलाचे तुटलेले कठडे आणि रस्त्यावरील खड्डे यास कारणीभूत आहेत. या मार्गावरील अपघातांचे प्रमाण काही अंशी तरी, नियंत्रणात यावे या उद्देशाने मेडशी पोलिसांनी ८ सप्टेंबर रोजी हे खड्डे बुजविले. अकोला- वाशिम महामार्गावर मेडशीपासून मालेगावकडे जाणाºया व मेडशीपासून मालेगावकडे ...

ठळक मुद्देमेडशी पोलिसांनी ८ सप्टेंबर रोजी हे खड्डे बुजविले. सामाजिक बांधिलकी: अपघातांवर नियंत्रणासाठी प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कमेडशी: गत काही दिवसांपासून अकोला-वाशिम राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत आहे. पुलाचे तुटलेले कठडे आणि रस्त्यावरील खड्डे यास कारणीभूत आहेत. या मार्गावरील अपघातांचे प्रमाण काही अंशी तरी, नियंत्रणात यावे या उद्देशाने मेडशी पोलिसांनी ८ सप्टेंबर रोजी हे खड्डे बुजविले. अकोला-वाशिम महामार्गावर मेडशीपासून मालेगावकडे जाणाºया व मेडशीपासून मालेगावकडे जाणाºया व मेडशीपासून पातूरकडे जाणाºया रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अनेक किरकोळ अपघातही घडले. त्यामुळे मेडशी येथील ग्रामस्थांनी हे खड्डे बुजविले; परंतु पावसाने ते पुन्हा जैसथे झाले. याच मार्गावर २९ आॅगस्ट रोजी सकाळच्या सुमारास खड्डे चुकविण्याच्या नादात एका वाहनचालकाने मालेगाव येथील विलास घुगे (३४) या विवाहित तरूणाला धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला असून, मृत्यूशी झुंज देत आहे. याच दिवशी सायंकाळी याच मार्गावर मेडशी येथून मालेगावकडे जात असलेले महावितरण कर्मचारी शिवलाल जाधव (५०) यांची दुचाकी खड्ड्यात आदळली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा दोन दिवसानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. या गंभीर घटनांची दखल घेऊन मेडशी पोलिसांनीच ८ सप्टेंबर रोजी या मार्गावरील खड्डे मुरूम टाकून बुजवित सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधाकर पवार व हेड कॉन्स्टेबल सचिन कल्ले यांनी यासाठी पुढाकार घेतला.

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिस