शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

लाच स्विकारताना पोलीस जमादार जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 14:12 IST

चार हजार रुपयांची लाच स्विकारताना रिसोड पोलीस स्टेशनचे जमादार संजय विठ्ठल आमटे (४८) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : प्रतिबंधात्मक कारवाईची तिव्रता कमी करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्विकारताना रिसोड पोलीस स्टेशनचे जमादार संजय विठ्ठल आमटे (४८) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) २ जुलै रोजी रिसोड पोलीस स्टेशन येथे रंगेहात ताब्यात घेतले.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार देणारा फिर्यादी आणि त्याच्या भावाविरूद्ध रिसोड पोलीस स्टेशन येथे भादंवी कलम ३२४, ४२७, ३४ नुसार गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यात त्यांनी रितसर जमानतीदेखील घेतल्या आहेत. या घटनेचा तपास जमादार संजय आमटे करीत असून, या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची प्रतिबंधात्मक कारवाई न करता तहसिलस्तरावरील प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी आमटे यांनी चार हजार रुपये लाचेची मागणी केली, अशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने १ जुलै रोजी दिली. या तक्रारीवरून पडताळणी केली असता, आमटे यांनी तक्रारदारास पंचासमक्ष चार हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे सिद्ध झाले. २ जुलै रोजी सापळा कार्यवाहीदरम्यान आमटे यांनी तक्रारदाराकडून चार हजार रुपयांची लाच स्विकारताच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आरोपीस रंगेहात ताब्यात घेतले. आरोपीविरूद्ध रिसोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक पी.टी. डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक एस.व्ही.शेळके यांचे पथकातील सहायक पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर परळकर, पोलीस कर्मचारी नितीन टवलारकर, विनोद सुर्वे, विनोद अवगळे, सुनिल मुंदे, राहूल व्यवहारे, शेख नाविद यांनी पार पाडली.

टॅग्स :washimवाशिमAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग