शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

जुलैपासून नववी ते बारावीची शाळा सुरू करण्याचे नियोजन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 16:41 IST

शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनस्तरावरून संभाव्य वेळापत्रक जिल्हास्तरीय शिक्षण विभागाला देण्यात आले आहे. 

वाशिम : कोरोनामुक्त असलेल्या क्षेत्रात नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग जुलैपासून सुरू करण्याचे नियोजन केले जात असून, जिल्हा परिषद शाळांमध्ये पूर्वनियोजन म्हणून मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायतींकडून विहित नमुन्यात जिल्हा परिषद प्रशासनाने माहिती मागविली आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर राज्यात मार्च महिन्याच्या तिसºया आठवड्यापासून शाळा बंद आहेत. विदर्भात २६ जूनपासून शैक्षणिक सत्राला दरवर्षी सुरूवात होते. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे शाळा केव्हा सुरू होतील, याचे निश्चित वेळापत्रक नाही. दुसरीकडे कोरोनामुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनस्तरावरून संभाव्य वेळापत्रक जिल्हास्तरीय शिक्षण विभागाला देण्यात आले आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही, याची खात्री करूनच शासनाने ठरवून दिलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचे नियोजन जिल्हास्तरावर केले जात आहे. त्यानुसार नववी, दहावी व बारावीचे वर्ग जुलै महिन्यापासून, सहावी ते आठवीचे वर्ग आॅगस्टपासून तर तिसरे ते पाचवीचे वर्ग सप्टेंबर महिन्यापासून सुरू करण्याचे नियोजन आहे. पहिली ते दुसरीच्या वर्गााबाबत निर्णय घेण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला दिले आहेत. टिव्ही, रेडीओवर उपलब्ध होणारे शैक्षणिक कार्यक्रम विद्यार्थ्यांना दाखविण्यासाठी, ऐकविण्यासाठी पालकांना प्रवृत्त करण्याची जबाबादारीही शाळा व्यवस्थापन समितीवर सोपविली आहे.दहावीचा निकाल लागल्यानंतर इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया आणि त्यानंतर अकरावीचा वर्ग सुरू करण्याचा विचार केला जाणार आहे. संभाव्य वेळापत्रकानुसार शाळा सुरू करण्यापूर्वी स्थानिक पातळीवर ग्राम पंचायत किंवा नगर परिषद, नगर पंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, कोविड ग्रामस्तरीय समिती, शिक्षण तज्ज्ञ, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक आदींशी चर्चाविनिमय करूनच निर्णय घेतला जाणार आहे, असे जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले.

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा