शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिल, मे महिन्यात नियोजित विवाह पुढे ढकलले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 11:39 IST

नेकांनी दिवाळीनंतर नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये लग्नाची तारीख काढून मंगल कार्यालये बुक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दरवर्षी मार्च ते जून या महिन्यांमध्ये लग्नकार्यांची अक्षरश: धूम असते. यामुळे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची मंगल कार्यालये गर्दीने गजबजून गेलेली असतात. यंदा मात्र कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून २५ मार्चपासून ३ मे पर्यंत ‘लॉक डाऊन’ करण्यात आला. परिणामी, एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये होणारे लग्नकार्य देखील रद्द झाले आहेत. अनेकांनी दिवाळीनंतर नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये लग्नाची तारीख काढून मंगल कार्यालये बुक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.वाशिम येथील स्वागत लॉन मंगल कार्यालयाचे संचालक सुरेश लोध यांनी सांगितले, की एप्रिल महिन्यात त्यांच्याकडे लग्नकार्यासाठी सहा लोकांनी अ‍ॅडव्हान्स रक्कम देऊन मंगल कार्यालय बुक केले; मात्र ‘लॉक डाऊन’मुळे एकही लग्न होऊ शकले नाही. मे महिन्यात लग्नकार्यासाठी ११ जणांनी मंगल कार्यालय बुक केले आहे; परंतु या महिन्यातही लग्नकार्य पार पडणार किंवा नाही, याबाबत अनिश्चितता असल्याने अनेकांनी नियोजित तारीख रद्द करून दिवाळीनंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२० या महिन्यांमधील तारीख बुक केल्याचे लोध यांनी सांगितले. वाजंत्री, स्वयंपाकी, फटाके विक्रेत्यांवरही ‘संक्रांत’!लग्नकार्यांमुळे बॅन्डपथक, डी.जे., स्वयंपाकी, फटाके विक्रेत्यांनाही सुगीचे दिवस प्राप्त होतात. यंदा मात्र कोरोना विषाणूच्या संसर्गाचे बिकट संकट उभे ठाकले असून त्यास प्रतिबंध करण्यासाठी ३ मे पर्यंत ‘लॉक डाऊन’ करण्यात आला. परिणामी, तारीख निश्चित झाल्यानंतर लग्नकार्यच रद्द झाल्याने वाजंत्री, स्वयंपाकी, फटाके विक्रेत्यांसोबतच या व्यवसायांवर विसंबून असलेल्या हजारो लोकांच्या रोजगारावर ‘संक्रांत’ ओढवली आहे.‘लॉक डाऊन’चा मोठा परिणाम सराफा मार्केट आणि कपडा मार्केटलाही बसला आहे. प्रामुख्याने मार्च ते जून या चार महिन्यांमधील लग्नसराईच्या हंगामात सराफा मार्केट आणि कपडा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते; मात्र सद्या हे दोन्ही व्यवसाय पूर्णत: ठप्प झाले आहेत.

टॅग्स :washimवाशिमmarriageलग्न