शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन ‘लिकेज’   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 15:18 IST

शिरपुर जैन: अडोळ प्रकल्पातून रिसोड शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन पार्डी तिखे येथे 'लिकेज' झाल्याने अनेक महिन्यांपासून पाण्याचा अपव्यय होत आहे. परंतु याकडे कुणाचेही लक्ष दिसून येत नाही. 

              शिरपुर जैन: अडोळ प्रकल्पातून रिसोड शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन पार्डी तिखे येथे 'लिकेज' झाल्याने अनेक महिन्यांपासून पाण्याचा अपव्यय होत आहे. परंतु याकडे कुणाचेही लक्ष दिसून येत नाही. मालेगाव तालुक्यातील शिरपूरपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या आडोळ प्रकल्पातून रिसोड शहराला पाणीपुरवठा होतो. त्यासाठी रिसोड नगरपरिषदेची स्वतंत्र पाईपलाईन आहे. ही पाईपलाईन जुलै महिन्यात लिकेज झाली होती. त्यावेळीही दररोज हजारो लिटर पाणी वाया गेले. तेव्हा लोकमतने वृत्त प्रकाशित करून रिसोड नगरपरिषदचे लक्ष वेधले होते. त्यानंतर रिसोड नगर परिषदने दुरुस्तीचे काम केल्याचे ऐकावयास मिळत होते परंतु त्यावेळी हे लिकेज काढण्यात आले नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. नोव्हेंबर महिन्यापासून पार्डी तिखे येथे पुन्हा रिसोड नगरपरिषदेची पाईपलाईन लिकेज झालेली दिसून येत आहे परंतु याकडे कुणाचेही लक्ष दिसून येत नाही. या लिकेजमुळे  दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. या लिकेजमुळे पार्डी तिखे येथील शेतकरी माधव भिवाजी तिखे यांच्या शेतातील हरभरा पिकाचेही नुकसान े झाले आहे. याविषयी रिसोड नगर परिषदचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांना  नोव्हेंबर महिन्यात भ्रमणध्वनीद्वारे माहिती देण्यात आली होती.  त्यावेळी त्यांनी रिसोड नगर परिषदेची निवडणूक सुरू असून निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याबरोबर पाईपलाईन दुरुस्त करण्यात येईल असे सांगितले असल्याचे बोलल्या जाते.  मात्र अद्यापही सदर पाईपलाईन दुरुस्त न केल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. यावर्षी पावसाळ्यात अडोळ प्रकल्प १०० टकके भरला असल्याने अजूनही प्रकल्पात मुबलक जलसाठा आहे. रिसोडसह शिरपूर व रिठद या गावाला सुद्धा अडोळ प्रकल्पातूनच पाणीपुरवठा केला जातो. मात्र लिकेज पाईपलाईनमुळे वाया जाणाºया पाण्याला रोखण्यासाठी कोणीही पुढाकार घेतांना दिसून येत नाही.

 

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैनRisodरिसोडWaterपाणी