शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
2
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
3
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
4
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
5
शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
6
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
7
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
8
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
9
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
11
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
12
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
13
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
14
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
15
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
16
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
17
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
18
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
19
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
20
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 

वाशिम जिल्ह्यात खासगी शिकवणी वर्ग सुरु करण्यास परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 10:49 IST

Permission to start private tuition classes in Washim district सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत  सुरू करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील सर्व खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस, संगणक प्रशिक्षण केंद्र, टंकलेखन प्रशिक्षण संस्था व इतर प्रशिक्षणास त्यांच्या एकूण आसन क्षमतेच्या २५ टक्के किंवा २५ व्यक्ती यापैकी कमी असेल त्या क्षमतेने सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत  सुरू करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व प्रकारची शैक्षणिक प्रशिक्षण केंद्र, खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस व टंकलेखन प्रशिक्षण संस्था व इतर प्रशिक्षणास मुभा देण्यात आली असून या प्रशिक्षण वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी दर १५ दिवसांनी कोरोना चाचणी करून घेणे संस्थेस बंधनकारक राहील. योग्य पद्धतीने मास्क घातल्याशिवाय संस्थेमध्ये प्रवेश देऊ नये. संस्थेत प्रवेशावेळी प्रवेशद्वाराजवळ थर्मल गनद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी करणे आवश्यक राहील. प्रत्येक बॅचनंतर वर्गखोली निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील. संस्था चालकांनी विद्यार्थी योग्यप्रमाणे मास्क परिधान करून, सुरक्षित अंतर राखत आहेत किंवा कसे याची खात्री करण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग ठेवणे आवश्यक राहील.  या नियमांचे उल्लंघन करणारी शैक्षणिक प्रशिक्षण केंद्र, खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस, शिक्षण संस्था केंद्र सरकारने कोरोना  ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून अधिसूचित असेपर्यंत बंद करण्यात येईल. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना मालकांवर १० रुपये दंड आकारण्यात येईल व कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या आदेशाचे भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व संबंधितांवर सदर कलमानुसार व साथरोग अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये कारवाई करण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था, संघटना यांच्यावर भारतीय दंड संहितेचे कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही, अशा अधिकाऱ्यास यापूर्वी निर्गमित केलेल्या आदेशानुसार पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्रCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक