वाशिम, दि. 25 - ‘चेतन सेवांकुर ग्रुप’मधील नेत्रहीन मुले त्यांच्या अंगी असलेल्या गुणांमुळे वाशिम जिल्ह्यासह राज्यातही प्रसिद्ध आहेत. या दिव्यांग मुलांनी चिनी मातीच्या भांड्यात पाणी घेऊन सुरेल संगीत देत राष्ट्रगीत वाजवून दाखवले. यावेळी त्यांचे सर्वांनी कौतुकही केले. ‘चेतन सेवांकुर ग्रुप’मधील नेत्रहीन मुले स्वत: विविध उपक्रम राबवून त्यामधून मिळणा-या मिळकतीद्वारे गृप चालवित आहेत. यासाठी वेगवेगळ्या सणांदरम्यान निरनिराळे उपक्रम राबवतात. उदाहरणार्थ, रक्षाबंधनाच्या पर्वावर अप्रतिम राख्यांची निर्मिती करणे, विविध सामाजिक उपक्रमात शेतकरी आत्महत्या, स्वच्छतेसही विविध विषयांवर मार्गदर्शन, व्यसनमुक्ती, नेत्रदान चळवळ, बेटी बचाव-बेटी पढाव, स्त्रीभ्रूण हत्या यांसह विविध उपक्रम राबवले जातात. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही या मुलांचा 30 जुलै रोजी गौरव केला व त्यांना प्रोत्साहन दिलं.
‘चेतन सेवांकुर ग्रुप’च्या नेत्रहीन मुलांची डोळस कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2017 13:27 IST