शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना कठोर भूमिका घेण्याची वेळ येऊ नये -  पवन बन्सोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 14:23 IST

सहाय्यक पोलीस अधीक्षक पवन बन्सोडे यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद...

- नंदकिशोर नारे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर प्रत्येकाने  सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासनाच्यावतिने गर्दी होऊ नये यासाठी दिवसरात्र मेहनत घेतल्या जात आहे. परंतु आजही काही महाभाग रस्त्यावर  काही काम नसतांना फिरत आहेत. प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेण्याच्या दृष्टीने पुढाकार घेणे गरजेचे आहे. कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमिवर पोलीस विभागाच्यावतिने काय उपाय योजना राबविण्यात येत आहेत यासंदर्भात सहाय्यक पोलीस अधीक्षक पवन बन्सोडे यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद...

गर्दी टाळण्यासाठी काय उपाय योजना करण्यात आल्या आहेत.?कोरोना विषाणुच्या पाशर््वभूमिवर गर्दी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतिने खूप मोठया प्रमाणात आवाहन केल्या गेले आहेत. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे याकरिता पोलीस विभागाने पुढाकार घेतला आहे. भाजी बाजार असो कि किराणा दुकानाजवळ चुन्याने गोल आखण्यासंदर्भात संबधितांना सूचना केल्या आहेत.

जिल्हयात किती पोलीस कर्मचारी तैनात आहेत.?जिल्हयातील सीमा बंद केल्याने प्रत्येक सीमाबंदीच्या ठिकाणी किमान तीन पोलीस कर्मचारी तसेच शहरातील चौकाचौकामध्ये पोलीस, होमगार्ड मिळून जवळपास १४०० कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत.

पोलीस कर्मचाºयांच्या संरक्षणार्थ काही उपाययोजना ?कोरोनाच्या पार्श्वभूमिवर दिवस रात्र पोलीस कर्मचारी मेहनत घेत आहे. आपले संपूर्ण कुटुंबापासून दूर राहणाºया कर्मचाºयांच्या आरोग्याची काळजी पाहता पोलीस अधीक्षक वसंत परदेसी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचाºयांना सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. तसेच प्रत्येक कर्मचाºयांसाठी पोलीस विभागाच्यावतिने मास्क तयार करुन वाटप केले. पोलीस कर्मचाºयांच्या सुरक्षितेसोबत रेडलाईट अलर्ट भागातील नागरिकांनाही मास्क व सॅनिटायझर वाटप केले आहे.

संचारबंदीत फिरणाºयांबाबत काय कारवाई ?संचारबंदीत आवश्यक काम असल्याशिवाय बाहेर निघू नये यासाठी जनजागृती करुनही अनेक जण याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्याकरिता पोलीस अधीक्षक वसंत परदेसी यांच्या मार्गदर्शनात कठोर पाऊले उचलण्यात आल्याने याचा खूप फायदा झाला आहे. माझ्या स्वत:च्या सब डिव्हीजनमध्ये २७५ जणांवर केसेस व २०० जणांची वाहने जप्त केली आहेत. जे अजुनही पोलीसांजवळ आहेत. कोरोना विषाणुवर अद्याप कोणत्याच प्रकारची लस, औषध उपलब्ध नाही.  खबरदारी हाच मोठा उपाय या विषाणुवर आहे. त्याकरिता प्रत्येक नागरिकांनी घरीच राहणे अति उत्तम, घराबाहेर जाणे अत्यावश्यकच आहे तर मास्कचा वापर करा. सॅनिटायझर सोबत ठेवा, गर्दीत जावू नका, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. तरच कोरोनाच्या लढाईत आपला विजय होईल.

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिसinterviewमुलाखत