शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

परवानगी नसतानाही ऑटोतून प्रवासी वाहतूक सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 10:24 IST

खासगी आॅटोंव्दारे ग्रामीण भागातून प्रवाशांची ने-आण सुरू असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्याचा समावेश ‘ग्रीन झोन’मध्ये असल्याने ४ मे पासून जिल्हा प्रशासनाकडून ‘लॉकडाऊन’ कायम ठेवत काही सेवा, सवलती प्रदान करण्यात आल्या; मात्र खबरदारीच्या दृष्टीकोणातून पुढील आदेशापर्यंत सार्वजनिक व खासगी प्रवासी वाहतूकीची सर्व साधने, आॅटोरिक्षासह बसेस बंद राहतील अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. असे असताना खासगी आॅटोंव्दारे ग्रामीण भागातून प्रवाशांची ने-आण सुरू असल्याचे दिसून येत आहे.कोरोना विषाणू संसर्गामुळे राज्यात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. वाशिमपासून ८० किलोमिटर अंतरावर असलेल्या अकोला जिल्ह्यात कोरोनाचे ७५ रुग्ण आढळले असून ५० किलोमिटर अंतरावर असलेल्या हिंगोली जिल्ह्यात रुग्णांचा आकडा ८९ वर पोहचला आहे. बुलडाणा, अमरावती आणि यवतमाळ या शेजारच्या जिल्ह्यांमध्येही कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने शेजारच्या पाचही जिल्ह्यांच्या सिमा बंद केल्या असून ठिकठिकाणी चेकपोस्ट तयार करून त्यावर पुरेसा बंदोबस्त तैनात केला आहे. असे असताना जिल्ह्यातील ग्रामीण भागातून शहरांमध्ये खासगी आॅटो, अ‍ॅपेच्या माध्यमातून ग्रामीण प्रवाशांची ने-आण करण्याचा गंभीर प्रकार राजरोस घडत आहे. नियमबाह्य घडत असलेल्या या प्रकारावर प्रशासनाने तत्काळ नियंत्रण मिळवावे, अशी मागणी होत आहे.

सकाळच्या सुमारास होतेय वाहनांची तोबा गर्दीग्रीन झोनमध्ये समावेश असलेल्या वाशिम जिल्ह्यात ४ मे पासून सकाळी ८ ते २ या वेळेत सर्वच प्रकारची दुकाने खुली ठेवण्यास मुभा मिळाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातूनही खरेदीसाठी नागरिक बाहेर पडत असून वाहनांची तोबा गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.

पाचपेक्षा अधिक प्रवासी; पोलिसांचे दुर्लक्षकोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागू केलेल्या नियमांमध्ये चारचाकी वाहनात दोनपेक्षा अधिक प्रवासी नको, असा नियम आहे; मात्र खासगी आॅटोंमध्ये पाचपेक्षा अधिक लोक बसून प्रवास करित आहेत. हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास येत नाही किंवा त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे, असा सवाल यानिमित्ताने सुज्ञ नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

आॅटोचालकांनीही खबरदारी घेण्याची गरजआॅटोमधून प्रवास करणाऱ्यांपैकी एखाद्या प्रवाशात कोरोनाची लक्षणे असल्यास सहप्रवाशांसोबतच आॅटोचालकांनाही गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे पुढील काही दिवस आॅटोचालकांनीही खबरदारी घेण्याची गरज असल्याचा सूर उमटत आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी वाशिम जिल्हा प्रशासनाने विविध स्वरूपातील उपाययोजना अंमलात आणल्या. सार्वजनिक व खासगी प्रवासी वाहतूकीची सर्व साधणे, आॅटोरिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याऊपरही असा प्रकार घडत असल्यास कारवाई केली जाईल.- ह्रषीकेश मोडक, जिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस