शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुट्यांमुळे रखडले खरडलेल्या जमिनींचे पंचनामे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 15:54 IST

नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण तत्काळ होणे अपेक्षित होते; परंतू शनिवार व रविवारची सुटी आल्याने नुकसानग्रस्तांच्या भेटीला प्रशासनातील अधिकारी, कर्मचाºयांनी जाण्याचे टाळले.

ठळक मुद्दे२२ जूनच्या मध्यरात्रीपासून २३ जूनच्या सकाळपर्यंत जिल्ह्यात तब्बल २०४ मिलीमिटर (सरासरी ३४ मिलीमिटर) पाऊस कोसळला. यामुळे ग्रामीण भागातील नाल्यांना पूर येऊन त्याचे पाणी शेतात घुसल्याने अनेकांच्या जमिनी खरडून गेल्या. ही बाब लक्षात घेवून महसूल विभागाकडून विनाविलंब नुकसानग्रस्तांच्या शेतीचे सर्वेक्षण सुरू होणे आवश्यक होते.

वाशिम : २२ जूनच्या मध्यरात्रीपासून २३ जूनच्या सकाळपर्यंत जिल्ह्यात तब्बल २०४ मिलीमिटर (सरासरी ३४ मिलीमिटर) पाऊस कोसळला. यामुळे ग्रामीण भागातील नाल्यांना पूर येऊन त्याचे पाणी शेतात घुसल्याने अनेकांच्या जमिनी खरडून गेल्या; तर काहीठिकाणी केलेली पेरणी वाहून गेली. दरम्यान, नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण तत्काळ होणे अपेक्षित होते; परंतू शनिवार व रविवारची सुटी आल्याने नुकसानग्रस्तांच्या भेटीला प्रशासनातील अधिकारी, कर्मचाºयांनी जाण्याचे टाळले. सोमवारपासून मात्र ही प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.गतवर्षी सरासरीच्या तुलनेत ३० टक्के पर्जन्यमान कमी झाले. त्यामुळे यंदा अल्पावधीतच शेतशिवारांमधील जलस्त्रोत पूर्णत: आटले होते. अशा बिकट परिस्थितीत वाशिम जिल्ह्यातील काही शेतकºयांनी चालू पावसाळ्यात पहिल्या एक-दोन पावसाच्या भरोशावर खरीप हंगामातील पेरणी उरकती घेतली. अनुकूल वातावरणामुळे बीजांकुर होऊन पिके देखील डोलायला लागली. मात्र, २२ जूनच्या मध्यरात्रीपासून झालेल्या जोरदार पावसामुळे पुन्हा एकवेळ शेतकºयांना संकटात पाडले असून नदी-नाल्यांना आलेल्या पुराचे पाणी शेतात घुसून शेलगाव बोंदाडे, कळमेश्वर, अनसिंग, सोंडा, इलखी, कोंडाळा महाली या गावांसह इतरही अनेक गावांमधील शेतजमिनी खरडल्या गेल्या. काही शेतशिवारांमध्ये तर माती वाहून गेल्याने सद्या सर्वत्र दगडधोंडे पसरल्याचे दिसून येत आहे. अशा जमिनींमध्ये दुबार पेरणी होण्याचीही शक्यता धुसर असल्याने शेतकरी पुन्हा एकवेळ मोठ्या संकटात सापडले आहेत. ही बाब लक्षात घेवून महसूल विभागाकडून विनाविलंब नुकसानग्रस्तांच्या शेतीचे सर्वेक्षण सुरू होणे आवश्यक होते. मात्र, सुट्यांमध्ये रममान प्रशासकीय अधिकारी, कर्मचाºयांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर कृषी सहायक, ग्रामसेवक आणि तलाठी अशा तीन लोकांच्या चमूचे पथक तयार करण्यात आले असून त्यांच्यावर नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. त्यानुसार, २२ जूनच्या पावसाने झालेल्या नुकसानाचेही सर्वेक्षण केले जाईल.- बाळासाहेब बोराडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी