वाशिम तालुक्यातील चार गावच्या शिवारातील शेतजमीन पावसाने खरडली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 02:26 PM2018-06-24T14:26:44+5:302018-06-24T14:29:21+5:30

वाशिम: गतवर्षी जिल्ह्यावर रुसलेल्या पावसाने यंदा मात्र उग्ररूप धारण केले आहे. गत दोन दिवसांत बरसलेल्या पावसाने अनेकांची पेरणी वाहून गेली असताना वाशिम तालुक्यातील दगड उमरा परिसरातील चार गावच्या शेतकऱ्यांची जमीनच पावसाने खरडून गेली आहे

farmland of Farmers of four villages flash out by rain | वाशिम तालुक्यातील चार गावच्या शिवारातील शेतजमीन पावसाने खरडली 

वाशिम तालुक्यातील चार गावच्या शिवारातील शेतजमीन पावसाने खरडली 

Next
ठळक मुद्दे शुक्रवार २२ जूनच्या रात्रीपासून २३ जूनच्या सकाळपर्यंत जिल्हाभरात धो धो पाऊस कोसळला. या एकाच दिवसांत तब्बल २०५ मि.मी. हून अधिक पावसाची नोंद करण्यात आली.शेलगाव घुगे, बाभुळगाव आणि जांभरूण जहागीर येथील ४० हून अधिक शेतकऱ्यांची शेतजमीनच पावसामुळे खरडली आहे.


वाशिम: गतवर्षी जिल्ह्यावर रुसलेल्या पावसाने यंदा मात्र उग्ररूप धारण केले आहे. गत दोन दिवसांत बरसलेल्या पावसाने अनेकांची पेरणी वाहून गेली असताना वाशिम तालुक्यातील दगड उमरा परिसरातील चार गावच्या शेतकऱ्यांची जमीनच पावसाने खरडून गेली आहे. यामुळे शेतकºयांनी पेरणीसाठी केलेला हजारो रुपयांचा खर्च पाण्यात गेलाच; परंतु आता जमिनी पेरणी योग्यही राहिल्या नाहीत. त्यामुळे या नुकसानीची महसूल विभागाने पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी होत आहे. 
वाशिम जिल्ह्यात गतवर्षी वार्षिक सरासरीच्या केवळ ८४ टक्के पाऊस पडला. यंदा मात्र जूनच्या २३ तारखेपर्यंतच २५ टक्क्यांच्या जवळपास पाऊस पडला. त्यातही शुक्रवार २२ जूनच्या रात्रीपासून २३ जूनच्या सकाळपर्यंत जिल्हाभरात धो धो पाऊस कोसळला. या एकाच दिवसांत तब्बल २०५ मि.मी. हून अधिक पावसाची नोंद करण्यात आली. या पावसाचा शेतकऱ्यांना फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक झाले आहे. वाशिम तालुक्यातील दगड उमरासह परिसरातील शेलगाव घुगे, बाभुळगाव आणि जांभरूण जहागीर येथील ४० हून अधिक शेतकऱ्यांची शेतजमीनच पावसामुळे खरडली आहे. या शेतकºयांनी पेरणीसाठी केलेला हजारो रुपयांचा खर्च व्यर्थ ठरला आहेच शिवाय ही जमीन आता पेरणीसाठी योग्यही राहिली नाही. महसूल आणि कृषी विभागाने संयुक्त पाहणी करून या नुकसानीपोटी शासनाकडून आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी नुकसाग्रस्त शेतकºयांच्यावतीने करण्यात येत आहे.

Web Title: farmland of Farmers of four villages flash out by rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.