लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रिसोड तालुक्यातून वाहणाºया पैनगंगा नदीपात्राचे खोलीकरण व रुंदीकरण अद्याप झाले नसल्याने, यासंदर्भात शेतकºयांसह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकूर यांनी १३ मे रोजी जिल्हाधिकाºयांशी चर्चा केली. या नदीपात्राचे रूंदीकरण व खोलीकरण झाल्यास शेतकºयांना याचा निश्चितच फायदा होईल, ही बाबही पटवून देण्यात आली.रिसोड तालुका हा महाराष्ट्र शासनाच्या दुष्काळग्रस्त यादीमध्ये समाविष्ट असून मागील १० ते १५ वर्षांपासून रिसोड तालुक्यामध्ये अत्यंत कमी प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे उन्हाळ्याला सुरूवात होण्यापूर्वीच रिसोड तालुक्यात पाणीटंचाई निर्माण होते. यावर्षीदेखील रिसोड तालुक्यात भीषण पाणीटंचाई आहे. कमी पर्जन्यमानाचा विपरित परिणाम कृषीक्षेत्रावरही जाणवतो. सध्याच्या स्थितीत मनुष्यासह, जनावरे व शेतीसाठीही पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे.रिसोड तालुक्यामधून वाहणारी व रिसोडची जीवनवाहीनी समजल्या जाणारी पैनगंगा नदी ही अनेक गावांची तहान भागविण्याबरोबरच शेकडो शेतकºयांचे हिरवे स्वप्न साकारत आहेत. मात्र, या नदीमधून आजपर्यंत कधीही गाळ काढलेला नाही तसेच नदी काठावरील दोन्ही बाजुने वाढलेली झाडे, झुडपांची तोड केली नाही. त्यामुळे नदीचे पात्र अरुंद होत चालले आहे. नदीपात्राच्या दोन्ही बाजुची झाडे, झुडपे काढल्यास रुंदीकरण होऊ शकते तसेच या नदीमधुन गाळ काढला तर येत्या पावसाळ्यात नदीत मुबलक पाणीसाठा राहू शकेल, ही बाब भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकूर यांनी जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांच्या निदर्शनात आणून दिली. नदीमधील गाळाचा उपसा केला तर हा गाळ आजुबाजुच्या शेतात टाकून शेतजमीन सुपीकही करता येवू शकते. सदर काम हे शासनाच्या पाटबंधारे विभाग, जलसंधारण किंवा भारतीय जैन संघटना आणि शासनाच्या संयुक्तपणे करावे, अशी मागणी ठाकूर यांच्यासह शेतकºयांनी निवेदनाव्दारे केली आहे.
पैनगंगा नदीचे खोलीकरण, रूंदीकरण रखडले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 17:50 IST