शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शाळास्तरावर होणार फुटबॉल स्पर्धेचे आयोजन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:24 IST

फुटबॉल खेळासंदर्भात  व्यापक प्रमाणात  जनजागृती म्हणून शाळा स्तरावर फुटबॉल स्पर्धेचे  आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी  यांनी बुधवारी दिल्या. त्या अनुषंगाने शिक्षण विभाग व  क्रीडा विभागाने गुरुवारपासून अंमलबजावणीला सुरुवात  केली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकार्‍यांची सूचना मुख्याध्यापक, संघटनांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : फुटबॉल खेळासंदर्भात  व्यापक प्रमाणात  जनजागृती म्हणून शाळा स्तरावर फुटबॉल स्पर्धेचे  आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी  यांनी बुधवारी दिल्या. त्या अनुषंगाने शिक्षण विभाग व  क्रीडा विभागाने गुरुवारपासून अंमलबजावणीला सुरुवात  केली आहे.जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी बुधवारी  जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात मु ख्याध्यापक व फुटबॉल संघटनांच्या प्रतिनिधींची मॅरेथान  आढावा सभा घेतली. जागतिक फुटबॉल महासंघाची  (फिफा) १७ वर्षाखालील विश्‍वचषक स्पर्धा ऑक्टोबर  महिन्यात भारतामध्ये होत आहे. या अनुषंगाने देशात  क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांनी राष्ट्रीय स्तरावर ‘मिशन-इलेव्हन मिलियन’  अभियान सुरू केले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात  ‘महाराष्ट्र मिशन वन मिलियन’ अभियान सुरू करण्यात  आले असून, या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये  फुटबॉलविषयी आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न होत  असून, जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक  यांनी आपल्या शाळांमध्ये फुटबॉल स्पर्धांचे आयोजन  करून विद्यार्थ्यांना फुटबॉल खेळासाठी प्रोत्साहित  करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी  केले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी संजय पांडे, प्रा थमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, माध्यमिक  शिक्षणाधिकारी डी.डी. नागरे उपस्थित होते. द्विवेदी  म्हणाले, की खेळामुळे शरीर सदृढ व निरोगी राहते.  त्यामुळे प्रत्येकाने किमान एका तरी क्रीडा प्रकारात रुची  निर्माण केली पाहिजे. सर्व मुख्याध्यापक व क्रीडा  शिक्षकांनी आपल्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला  किमान एका तरी खेळाचे प्रशिक्षण देऊन त्यांचे कौशल्य  विकसित करण्यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करावे.  तसेच १५ सप्टेंबर २0१७ रोजी फुटबॉल स्पर्धेचे   आयोजन करून ‘महाराष्ट्र मिशन वन मिलियन’मध्ये  सहभाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे  आवाहन केले. प्रास्ताविकमध्ये पांडे यांनी ‘महाराष्ट्र  मिशन वन मिलियन’विषयी सविस्तर माहिती दिली.  माध्यमिक शिक्षणाधिकारी नागरे यांनीही मार्गदर्शन केले.  गुरुवारपासून स्पर्धेच्या दृष्टीने नियोजनाला सुरुवात  झाली.