शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

लाडेगाव येथील सेंद्रिय गहू पोहोचला सातासमुद्रापार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 11:38 IST

Organic wheat of Washim reach Dubai हा गहू एसटीच्या मालवाहतुकीद्वारे मुंबईला आणि मुंबईहून विमान वाहतुकीने थेट दुबईला रवाना केला.

ठळक मुद्दे‘खपली गहू’ असा ब्रॅण्ड तयार करून नवी ओळख निर्माण केली. हा गहू स्वादिष्ट आणि पौष्टिक असल्याने त्याला मागणी वाढत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधनज  : कारंजा लाड तालुक्यामधील लाडेगाव येथील प्रगतिशील शेतकरी तथा ‘गंगा शेतकरी, शेतमजूर बचतगट लाडेगाव’चे अध्यक्ष श्याम रामदास सवाई यांनी केवळ प्रयोगातून सुरुवात केलेल्या सेेंद्रिय गहू पिकातून लाखो रुपयांचे उत्पन्न घेण्यास सुरुवात केली असून, त्यांचा हा गहू आता सातासमुद्रापार दुबईत पोहोचला आहे.श्याम रामदास सवाई यांनी यावर्षी त्यांच्या शेतात प्रयोग म्हणून सेंद्रिय पद्धतीने गहू या पिकाची  पेरणी केली होती.  या पिकाचे भरघोस उत्पन्न त्यांना मिळाले. त्यानंतर गंगा गृहोद्योग गटाच्या माध्यमातून त्यांनी या पिकाचा ‘खपली गहू’ असा ब्रॅण्ड तयार करून नवी ओळख निर्माण केली. त्यांचा हा प्रयोग एवढा यशस्वी झाला की, आता या पौष्टिक गव्हाच्या खरेदीसाठी देशभरातून मागणी येत आहे. मागील काही दिवसांपूर्वीच त्यांनी हा गहू एसटीच्या मालवाहतुकीद्वारे मुंबईला आणि मुंबईहून विमान वाहतुकीने थेट दुबईला रवाना केला. मूळचे कारंजा लाड येथील आणि सध्या दुबई येथे स्थायिक होत मसालाकिंग म्हणून ओळख निर्माण केलेले उद्योजक डॉ. धनजंय दातार यांनी शेतकरी आणि उत्पादित शेती मालाला प्रोत्साहन देण्यासाठी श्याम सवाई यांनी उत्पादित केलेल्या गव्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. 

सामान्य गव्हापेक्षा पौष्टिक खपली गव्हामध्ये इतर गव्हाच्या तुलनेत ६० टक्के अधिक लोहसत्त्व असते. सोबतच प्रोटीन, स्टार्चसारखे दुसरे पोषक तत्त्वदेखील आहेत. महत्त्वाचे म्हणजे हा गहू शुगर फ्रीदेखील आहे. ग्लूटेन फ्री, डायबेटिक फ्रेंडली तसेच प्रोटीन्स १०-१२ टक्के, फायबर्स १४-१६ टक्के, कमी कॉलेस्ट्रॉल पातळी अशी या गव्हाची वैशिष्ट्ये आहेत. या गव्हाच्या सेवनामुळे आम्लपित्ताच्या आजारावर नियंत्रण राहते. खाण्यास अत्यंत चवदार आणि पचन क्रियेस सुलभ असा हा गहू आहे.

लाडेगाव येथील प्रगतिशील शेतकरी श्याम सवाई यांनी सेंद्रिय पद्धतीने गहू पिकाचे उत्पादन घेत खपली ब्रॅण्ड म्हणून गव्हाची ओळख निर्माण केली आहे.  हा गहू त्यांनी दुबई येथे पाठविला असून, इतर गव्हाच्या तुलनेत हा गहू स्वादिष्ट आणि पौष्टिक असल्याने त्याला मागणी वाढत आहे.-संतोष वाळके,तालुका कृषी अधिकारी, कारंजा

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीDubaiदुबई