शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसाठी शेतकरी धडकले वाशिम तहसिलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 13:49 IST

वाशिम : यावर्षीची दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहिर करण्यात यावा, अशी मागणी शेतकºयांसह वाशिम, मंगरूळपीर युवक काँग्रेसचे पदाधिकारी, पंचायत समिती सदस्यांनी १६ आॅक्टोबर रोजी तहसिलदारांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यावर्षीची दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहिर करण्यात यावा, अशी मागणी शेतकºयांसह वाशिम, मंगरूळपीर युवक काँग्रेसचे पदाधिकारी, पंचायत समिती सदस्यांनी १६ आॅक्टोबर रोजी तहसिलदारांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली.यावर्षी पावसाने सरासरी गाठली नाही. पावसात खंड पडल्याने पिकांच्या उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट येत आहे. खरिप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद, कपाशी आदी पिकांना विविध कारणांमुळे जबर फटका बसला आहे. भारनियमन, प्रकल्पांतील अल्प जलसाठा यामुळे रब्बी हंगामही संकटात सापडला आहे. अशा अवस्थेत जिल्हा दुष्काळसदृश परिस्थितीच्या उंबरठ्यावर असताना शासनाने केवळ रिसोड तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत केला आहे. संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असल्यामुळे वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी वाशिम पंचायत समितीच्या सदस्यांसह शेतकरी, वाशिम-मंगरूळपीर युवक काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली. शासनाची फसवी कर्जमाफी योजना, फसवी हमीभाव योजना, शेतमालाला मिळणारा कवडीमोल भाव आदींमुळे शेतकरी अगोदरच वैफल्यग्रस्त असून, शेतकºयांना दिलासा म्हणून संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहिर करावा, अशी मागणी वाशिम- मंगरूळपीर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गोटे, वाशिम पंचायत समितीचे माजी सभापती विरेंद्र देशमुख, बाळासाहेब रोकडे, बाळासाहेब लेमाणे, शे. इरफान शे. सुलतान, सिद्धार्थ सावध, गोपाल सावके, जय सावके, ईश्वर राठोड, गजानन वायचाळ, राम इढोळे, संदीव शिंदे, पंढरी जाधव यांच्यासह शेतकºयांनी केली.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीcongressकाँग्रेस