शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम वऱ्हाडातील संत्रा अडकला परराज्यातील ‘कोल्ड स्टोअरेज’मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 11:21 IST

अनेक संत्रा बागायतदारांनी हैदराबाद येथील कोल्ड हाऊसमध्ये संत्रा ठेवलेला आहे.

वाशिम : पश्चिम वºहाडात बऱ्यापैकी संत्रा फळबाग आहे; त्या तुलनेत कोल्ड हाऊसची सुविधा उपलब्ध नाही. संत्र्याला चांगला भाव मिळावा म्हणून पश्चिम वºहाडातील अनेक शेतकरी परराज्यातील कोल्ड स्टोअरेजमध्ये संत्रा ठेवतात. याहीवर्षी अनेक संत्रा बागायतदारांनी हैदराबाद येथील कोल्ड हाऊसमध्ये संत्रा ठेवलेला आहे. कोरोना विषाणूमुळे परराज्याच्या सीमा बंद असल्याने पश्चिम वºहाडातील शेतकऱ्यांना परराज्यातून संत्रा आणणे कठीण झाले आहे. परिणामी, शेतकºयांची चिंता वाढली आहे.शेतीला आधुनिकतेची जोड देत पश्चिम वºहाडातील अनेक शेतकरी फळबागेकडे वळले आहेत. अकोला, वाशिम व बुलडाणा या तीन जिल्ह्यात १५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर संत्रा फळबाग असून या माध्यमातून अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकºयांकडून होत आहे. पश्चिम वºहाडात संत्र्यासाठी महत्वाची बाजारपेठ उपलब्ध नसल्याने अपेक्षीत बाजारभाव मिळत नाही, अशी खंत वाशिम जिल्ह्यातील मुंगळा येथील संत्रा उत्पादक महादेव राऊत यांनी व्यक्त केली. अपेक्षीत बाजारभाव येईपर्यंत संत्र्याची साठवणूक करण्यासाठी पश्चिम वºहाडात कोल्ड स्टोअरेज हाऊसची सुविधा पुरेशा प्रमाणात नाही. परिणामी, शेतकरी हैद्राबाद येथील कोल्ड स्टोअरेजला पसंती देतात.

पश्चिम वºहाडातील जवळपास ६० ते ७० शेतकºयांनी हैद्राबाद येथील कोल्ड स्टोअरेजमध्ये संत्र्याची साठवणूक केली. परंतू, त्यानंतर कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परराज्याच्या तसेच जिल्ह्याच्या सीमा वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या. त्यामुळे शेतकºयांचा संत्रा हैद्राबाद येथे अडकून पडला आहे. संत्रा खराब तर होणार नाही या भीतीने शेतकºयांची झोप उडाली आहे. संत्रा आणण्याकरीता शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी संत्रा उत्पादक महादेव राऊत, लक्ष्मण राऊत, अशोक केळे, गजानन केळे, पांडुरंग राऊत, नंदू केळे आदींनी १६ एप्रिल रोजी केली.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी