शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

जनतेतून सरपंच निवडीला विरोध

By admin | Updated: July 17, 2017 02:37 IST

माजी सरपंच-उपसरपंच बैठकीत ‘सरपंच निवड प्रक्रिये’वर मंथन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: थेट जनतेतून सरपंच निवड होण्याबाबतचा सरकारचा निर्णय हा अतिशय चुकीचा व घातक असून, धनदांडग्यांना पुढे रेटण्याचा व दुबळ्यांना मागे हटविण्याचाच कुटील डाव म्हटला पाहिजे, असे मत आमदलचे प्रमुख गंगाधर कांबळे यांनी वाशिम येथील माजी सरपंच-उपसरपंच बैठकीमध्ये व्यक्त केले.१६ जुलै रोजी वाशिम येथील विश्रामगृहात माजी सरपंच- उपसरपंच यांची जिल्हास्तरीय बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी उत्तमराव खडसे तर प्रमुख अतिथी म्हणून दारिद्र्यनिर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष रमेश भलेराव, आमदल प्रवक्ता रवींद्र इंगोले, पं.स. सदस्य जनार्दन सोनुने, नारायण आव्हाळे, मधुकर इंगोले, डिगांबर काळे यांची उपस्थिती होती. यावेळी मोबीसिंग राठोड, भारत पाटील, रवी खंडारे, डॉ. पौळकर, रामकिसन वाघमारे, श्रावण काबळे, सहभागी होते. गंगाधर कांबळे म्हणाले की, सरपंच निवडीच्या निर्णयामुळे बलवान मंडळींना आनंदाच्या उकळया फुटत असल्या तरी सर्वसामान्य गोरगरीब लोकांसाठी मात्र हा निर्णय क्लेशदायक ठरणारा आहे, असे भाकित त्यांनी वर्तविले. या निवड प्रक्रियेला विरोध व जनजागृती करण्यासंदर्भात आंदोलन तीव्र केले जाणार आहे. यासाठी आमदलद्वारा ११ कलमी कार्यक्रम घेऊन सहा जिल्ह्यांमध्ये आंदोलन केले जाणार आहे, असे कांबळे म्हणाले. थेट जनतेतून होणार असलेली सरपंच निवड ही सामान्य व गोरगरीब जनतेसाठी घातक असल्यामुळे ती रद्द करण्यात यावी यासाठी प्रखर संघर्ष उभा करणे, माजी सरपंच उपसपरंच यांना दरमहा ३ हजार रुपये निवृत्तीवेतन व सन्मानधन मिळण्यासाठी आग्रह धरणे व विद्यमान ग्रा.पं. सदस्याला अधिकार प्राप्त होण्यासाठी संघर्षाची भूमिका घेणे हे चार ठराव या बैठकीत पारित करण्यात आले. संचालन व आभार दीपक भालेराव यांनी केले.