शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
2
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
3
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
4
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
5
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
6
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
7
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
8
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
9
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
10
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
11
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
12
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
13
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
14
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
15
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
16
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
17
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
18
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
19
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
20
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर ! अनंतराव देशमुखांच्या भूमिकेकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 19:52 IST

शिवसेना, भाजपा या पक्षाची युती होणार की नाही हे अद्याप अस्पष्ट असल्याने दोन्ही पक्षाच्या इच्छुकांनी मुंबईवारी सुरू ठेवली आहे.

- संतोष वानखडे

वाशिम : आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच रिसोड विधानसभा मतदारसंघात वातावरण तापत असून, काँग्रेसचा हा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी विरोधक सरसावले आहेत. त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार अनंतराव देशमुख यांची भूमिका अद्याप स्पष्ट झाली नसल्याने काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

पूर्वाश्रमीचा मेडशी विधानसभा मतदारसंघ आणि २००९ मधील मतदारसंघ पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलेल्या रिसोड विधानसभा मतदारसंघात १९९९ आणि २००४ चा अपवाद वगळता उर्वरीत निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने राजकीय समिकरणेही बदलली आहेत. काँग्रेससह भाजपामध्येही गटबाजी असल्याने या गटबाजीचा लाभ उठविण्याचा प्रयत्न शिवसेना, शिवसंग्राम या पक्षाकडून होत असल्याचे दिसून येते.

शिवसेना, भाजपा या पक्षाची युती होणार की नाही हे अद्याप अस्पष्ट असल्याने दोन्ही पक्षाच्या इच्छुकांनी मुंबईवारी सुरू ठेवली आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून विद्यमान आमदारांचे तिकट निश्चित मानले जात असल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार अनंतराव देशमुख कोणती भूमिका घेतात, यावर पुढील चित्र अवलंबून राहणार आहे. अनंतराव देशमुख यांनी पूत्र नकुल यांच्यासाठी समर्थकांचा मेळावा घेऊन विधानसभा निवडणुकीसाठी चाचपणी केली होती. त्यांनी आपला निर्णय राखून ठेवल्याने काँग्रेसच्या गोटात तुर्तास तरी अस्वस्थता असल्याचे दिसून येते.

दुसरीकडे अंतर्गत गटबाजीवर तोंडसुख घेत भाजपा ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा देत वंचित बहुजन आघाडी जवळ केली आहे. सोबतच राकॉचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांनी देखील वंचित आघाडीची वाट धरल्याने चुरस निर्माण झाली. सेना, भाजपा व शिवसंग्राम या तिनही पक्षाच्या इच्छूकांनी रिसोड मतदारसंघावर दावा ठोकल्याने तिढा वाढला आहे. सेना, भाजपा युती संदर्भात वरिष्ठ स्तरावर ठोस भूमिका नसल्याने दोन्ही पक्षाच्या इच्छूकांनी मोचेर्बांधणीला वेग दिला आहे. त्यातच शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी दोन वेळा भेटी देऊन रिसोड मतदारसंघातील राजकीय वातावरण तापविले आहे.

युतीत हा मतदारसंघ कुणाला सुटतो आणि उमेदवार कोण राहिल यावर लढतीचे चित्र अवलंबून राहणार आहे. एकंदरित काँग्रेसचा हा बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी विरोधकांनी कंबर कसल्याने आणि त्यात वंचित आघाडीने वातावरण निर्मिती केल्याने काँग्रेससमोर तगडे आव्हान निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसनेदेखील परंपरागत मतदार टिकवून ठेवण्याबरोबरच अन्य मतदारांना पक्षाशी जोडण्याचे प्रयत्न चालविल्याचे दिसून येते. विरोधकांनी निर्माण केलेल्या या आव्हानांवर मात करण्यासाठी कॉंग्रेसला मतदारांची कितपत साथ मिळते, यावर या बालेकिल्ल्याचे भवितव्य अवलंबून आहे.

टॅग्स :washimवाशिमcongressकाँग्रेस