शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांनी कितीही कांगावा केला तरी पुढचे सरकार भाजपाचेच - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 16:24 IST

विरोधकांनी कितीही कांगावा केला तरी पुढचे सरकारही भाजपाचेच राहणार असल्याचा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे शनिवार, १ सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

ठळक मुद्देसंविधान बदलण्याच्या नव्हे; तर ते अधिक मजबूत करण्याचा सरकारचा विचार भाजपा सरकारने आपल्या कारकिर्दीत ‘अ‍ॅॅट्रॉसिटी अ‍ॅॅक्ट’ला कुठलाही धक्का बसू दिला नाही.हितकारी ध्येयधोरणांमुळे ‘आरपीआय’ यापुढेही भाजपासोबतच राहणार असल्याचे ना. आठवले म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : देशातील काळा पैसा बाहेर यावा, यासाठी भाजपा सरकारने जाहीर केलेला नोटाबंदीचा निर्णय निश्चितपणे यशस्वी झाला. याशिवाय कर चोरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी देशभरात ‘जीएसटी’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. मुद्रा, उज्वला, पीकविमा, ग्रामसडक यासारख्या महत्वाकांक्षी योजना राबवून तळागाळातील लोकांचे हित जोपासले जात आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही कांगावा केला तरी पुढचे सरकारही भाजपाचेच राहणार असल्याचा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे शनिवार, १ सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.विद्यमान भाजपा सरकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलणार असल्याच्या वावड्या विरोधकांकडून उठविल्या जात आहेत; परंतु संविधान बदलण्याच्या नव्हे; तर ते अधिक मजबूत करण्याचा सरकारचा विचार असल्याचे सांगून ना. आठवले पुढे म्हणाले, की भाजपा सरकारने आपल्या कारकिर्दीत ‘अ‍ॅॅट्रॉसिटी अ‍ॅॅक्ट’ला कुठलाही धक्का बसू दिला नाही. याशिवाय जातीनिहाय आरक्षणाचा विषय देखील सरकार अभ्यासपूर्ण हाताळत आहे. सरकारच्या याच सर्वसामान्यांच्या हितकारी ध्येयधोरणांमुळे ‘आरपीआय’ यापुढेही भाजपासोबतच राहणार असल्याचे ना. आठवले म्हणाले.कोरेगाव भीमा येथील दंगल, संभाजी भिडे यांची भूमिका, आदिंबाबत छेडले असता, कोरेगाव भीमा येथील दंगल सवर्णांनी घडवून आणल्याचे सांगून त्याच्याशी एल्गार परिषदेचा कुठलाही संबंध नसल्याचे ते म्हणाले. संविधानाला विरोध करून अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारी भूमिका संभाजी भिडे यांनी बाळगली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सातत्याने पुढे रेटली जात आहे. पोलिस प्रशासनाने यादृष्टीने तपास करणे आवश्यक असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, रिपाइं जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांच्यासह ‘आरपीआय’चे पदाधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेwashimवाशिमBJPभाजपाPoliticsराजकारण