शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Operation Muskan : २० मुलींचा अद्यापही लागला नाही शाेध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 10:55 IST

Operation Muskan: पळून गेलेल्या ७९ मुलींपैकी ५९ मुलींचा व चार मुलांचा शाेध लावण्यात पाेलिसांना यश आले असले तरी अद्याप २० मुलींचा शाेध लागलेला नाही.

ठळक मुद्दे७९ पैकी ५९ मुलींचा शाेध लागला.ज्या मुली बेपत्ता आहेत त्यांचा शाेध घेणे सुरु आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : हरवलेल्या मुलांसाठी केंद्र सरकारच्या आदेशान्वये १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत   जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान राबवले जात आहे. याअंतर्गत एकही मुलाचा शाेध लागलेला नाही. तसेच जानेवारी ते नाेव्हेंबर २०२० दरम्यान हरविलेल्या, पळून गेलेल्या ७९ मुलींपैकी ५९ मुलींचा व घरून पळून गेलेल्या चारही मुलांचा शाेध लावण्यात पाेलिसांना यश आले असले तरी अद्याप २० मुलींचा शाेध लागलेला नाही.ऑपरेशन मुस्कान अंतर्गत पळून गेलेल्या, बेपत्ता असलेल्या मुलांचा शाेध पाेलीस विभागाकडून घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले असून, ३१ डिसेंबरनंतर या माेहिमेतील कामगिरीबाबतची माहिती देण्यात येणार असल्याचे पाेलीस विभागाकडून सांगण्यात आले.घरून पळून गेलेली मुले वाशिम, मंगरूळपीर, कारंजा व शिरपूर येथीलवाशिम जिल्ह्यातून जानेवारी ते नाेव्हेंबर २०२० दरम्यान घरून पळून निघून गेलेल्या मुलांमध्ये जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर, कारंजा व शिरपूर येथील मुलांचा समावेश आहे. घरातील कटकट, काही तरी करण्याची मनी जिद्द या कारणामुळे ही मुले घरून पळून गेली हाेती. या मुलांना मुंबई, पुणे, नागपूर येथून पाेलिसांनी शाेधले व त्यांच्या      कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.

पळून जाणाऱ्या मुली विविध प्रलाेभनांच्या बळी जिल्ह्यातून जानेवारी ते नाेव्हेंबर २०२० दरम्यान घरून निघून गेलेल्या, पळून गेलेल्या तब्बल ७९ मुलींपैकी बहुतांश मुली या लग्नाचे आमिष, नाेकरी लावून देण्याच्या प्रलाेभनामुळे घरून पळून गेल्या. यातील काही मुली स्वत:हून घरी परतल्या तर काहींचा पाेलिसांनी शाेध घेत पालकांच्या स्वाधीन केले. ७९ पैकी ५९ मुलींचा शाेध लागला. अद्याप २० मुलींचा शाेध सुरू आहे.

ऑपरेशन मुस्कानद्वारे मुलांचा शाेध घेणे सुरूजिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान राबवले जात आहे. याअंतर्गत १ ते ३० डिसेंबरदरम्यान बेपत्ता, हरवलेल्या मुलांचा शाेध घेणे सुरू आहे. यामध्ये जिल्ह्यातील मुलगा घरून निघून गेलेल्यांपैकी एकही शाेध बाकी नाही. आतापर्यंत हरविलेल्या चारही मुलांचा शाेध पाेलिसांनी घेऊन मुलांना पाल्यांच्या स्वाधीन केले. मुलींचा शाेध घेणे सुरू आहे.

सर्व पाेलीस स्टेशनला ऑपरेशनच्या सूचनाजिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान राबवले जात असून यासंदर्भात सर्व पाेलीस स्टेशनला सूचना देण्यात आल्या आहेत. घरुन निघून गेलेल्या, बेपत्ता असलेल्या जवळपास मुलांचा शाेध यापूवीर्च लागला आहे. ज्या मुली बेपत्ता आहेत त्यांचा शाेध घेणे सुरु आहे.- शिवा ठाकरे, स्थानिक गुन्हे शाखा

टॅग्स :washimवाशिमPoliceपोलिसMissingबेपत्ता होणं