शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

महावितरणचा गलथान कारभार; ग्रामस्थांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 16:17 IST

मालेगाव: ताकतोडा गटग्रामपंचायत अंतर्गत विज तारा छतालगत लोंबकळत असताना विजखांबही झुकले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव: ताकतोडा गटग्रामपंचायत अंतर्गत विज तारा छतालगत लोंबकळत असताना विजखांबही झुकले आहेत. यामुळे वादळी वाºयाने या तारा वा खांब कोसळल्यास अपघात घडून ग्रामस्थांचा जीव धोक्यात येऊ शकतो. तथापि, महावितरणचे या प्रकाराकडे दुर्लक्ष आहे. मालेगाव तालुक्यातील ताकतोडा गटग्रामपंचायत अंतर्गत ताकतोडासह  दापुरी कालवे, सोमठाणा या गावांचा समावेश आहे. या तिन्ही गावांत मिळून दोन हजार लोक वास्तव्य करीत आहेत. या तिन्ही गावातील ग्रामस्थांना महावितरणच्या दुर्लक्षामुळे जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. अनेक ठिकाणी विजेच्या तारा खाली लोंबकळत आहेत, तर काही खांबही झुकले आहेत. वादळी वाºयाने वीज तारा तुटून खाली पडण्याच्या घटना काही वेळा घडल्या आहेत. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत होण्याचा प्रकार नित्याचाच झाला आहे. त्यात गेल्या पाच महिन्यांपासून कोणताही लाईनमन या गावांत फिरकला नाही. बरेच वेळा खाजगी लाईनमनकडून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम करून घ्यावे लागते.  यासंदर्भात गावकºयांनी शिरपूर, मालेगाव, तसेच वाशिम या ठिकाणी तक्रारी केल्या, निवेदनही दिले; मात्र गावकºयांच्या निवेदनाची दखल घेऊन अद्यापही कोणताही प्रश्न सोडवला नाही. गावात केवळ एकच रोहित्र असून, याच रोहित्रावर कृषीपंपांसह गावकºयांना वीज पुरवठा केला जातो. तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर अनेकदा येथील ग्रामस्थांना अंधारात रात्र काढण्याची वेळही अनुभवावी लागली. या प्रकारामुळे ग्रामस्थांचा जीवच धोक्यात असल्याने गावकºयांत संतापाची लाट उसळली असून, महावितरणच्या अधिकाºयांनी दखल घेऊ न तातडीने समस्या न सोडविल्यास आंदोलन करण्याचा इशारा सरपंचांनी दिला आहे.  

आमच्या गावात विजेचा फार मोठा गंभीर प्रश्न आहे. अनेकदा विजेच्या तारा तुटून खाली पडतात. महावितरण कंपनीने मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कोणतीही कामे या गावांत केली नाहीत. त्यामुळे थोडाही जोराचा वारा सुटला की वीज तारांचे परस्पर घर्षण होऊन त्या तुटून पडताज. यामुळे अपघात घडण्याची भिती आहे. याबाबत तक्रार आणि निवेदन देऊन दखल घेण्यात आलेली नाही. -दयानंद व्यवहारे (सरपंच) गट ग्रामपंचायत, ताकतोडा

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण