शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

शालार्थ प्रणाली; कार्यवाहीचे अहवाल सादर करण्यास उरले तीन दिवस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 16:03 IST

अंतीम मुदत १७ मे असून विहित नमुन्यात माहिती भरताना मुख्याध्यापकांची तारांबळ उडत असल्याचे दिसून येत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शालेय शिक्षण विभागातील सर्व व्यवस्थापनाच्या शिक्षकशिक्षकेतर कर्मचाºयांचे वेतन ‘आॅनलाईन’ पद्धतीने करण्यासाठी राज्य शासनाकडून शालार्थ वेतन प्रणाली अंमलात आली. मात्र, विविध स्वरूपातील अडचणींमुळे जानेवारी २०१८ पासून बंद असलेली ही प्रणाली आता पुन्हा सुरू झाली असून कर्मचारी अटॅच, डिटॅच करणे आणि विविध कारणांमुळे शिक्षकांची सेवा समाप्त झाल्यास तशी माहिती सादर करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्याची अंतीम मुदत १७ मे असून विहित नमुन्यात माहिती भरताना मुख्याध्यापकांची तारांबळ उडत असल्याचे दिसून येत आहे. वाशिम येथील वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक अधीक्षक ए.यू. कदम यांनी यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांकडे पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे, की जानेवारी २०१८ पासून काही तांत्रीक अडचणींमुळे शालार्थ प्रणालीचे काम बंद होते. ही प्रणाली पुर्ववत सुरू करण्याचे काम ‘महा-आय टी’कडे सोपविण्यात आले असून तांत्रीक अडचणी दूर झाल्या आहेत. सद्या शालार्थ प्रणालीमध्ये आॅगस्ट २०१७ पर्यंत माहिती उपलब्ध आहे. दरम्यान, आयुक्तांच्या आदेशानुसार बदली, समायोजन, पदोन्नती मिळालेल्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाºयांना अटॅच अथवा डिटॅच करणे आणि सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्ती, मयत कर्मचाºयांची सेवा शालार्थ प्रणालीतून समाप्त करण्याबाबत आदेशीत करण्यात आले आहे. त्यानुसार, शालार्थ प्रणालीत संबंधित दोन टॅब कार्यान्वित करण्यात आले असून १० मे ते १७ मे या कालावधीत सदर माहिती भरून सादर करावयाची आहे, असे वेतन पथक अधीक्षकांनी कळविले.दरम्यान, शालार्थ प्रणालीमध्ये आॅगस्ट २०१७ पर्यंतचीच माहिती भरण्यात आलेली असल्याने त्यापुढे २१ महिन्यांमध्ये झालेले बदल अद्ययावत करून विहित नमुन्यात माहिती भरताना सर्वच शाळांच्या मुख्याध्यापकांची पुरती तारांबळ उडत असून उन्हाळ्याच्या सुट्यांवर बहुतांशी पाणी फेरले गेल्याचा सूर काही मुख्याध्यापकांमधून उमटत आहे.डीडीओ-२ च्या मान्यतेशिवाय कार्यवाही अपूर्णशाळास्तरावर डीडीओ-१ अर्थात मुख्याध्यापकांनी शालार्थ प्रणालीमध्ये कर्मचारी ‘अटॅच-डिटॅच’ करणे आणि ‘सर्व्हिस एन्ड’बाबतची कार्यवाही प्राधान्याने पूर्ण करून अंतीम मंजूरीकरिता अहवाल डीडीओ-२ अर्थात वेतन पथक, माध्यमिक यांच्याकडे पाठवून मान्यता घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय केलेली कार्यवाही पूर्ण होणार नाही. यासंदर्भात वेतन पथक कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना, प्राचार्यांना यापूर्वीच पत्र पाठवून सविस्तर सूचना दिल्या आहेत. त्याचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दोन ‘टॅब’ व्यतिरिक्त कुठलीही कार्यवाही न करण्याचे निर्देश शालार्थ प्रणालीमध्ये केवळ कर्मचारी ‘अटॅच-डिटॅच’ करणे आणि ‘सर्व्हिस एन्ड’बाबतची कार्यवाही प्राधान्याने पूर्ण करणे हे दोन ‘टॅब’च कार्यान्वित करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त प्रणालीत इतर कुठलीही कार्यवाही करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळाTeacherशिक्षक