शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
3
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
4
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
5
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
6
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
7
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
8
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
9
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
10
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
11
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
12
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
14
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
15
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
16
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
17
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
18
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
19
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
20
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम

वाशिम जिल्ह्यातील धरणांत केवळ ३ टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 15:57 IST

वाशिम : जिल्ह्यातील तीन मध्यम आणि १३१ लघू अशा एकूण १३४ धरणांमध्ये सद्य:स्थितीत केवळ तीन टक्के जलसाठा उरला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील तीन मध्यम आणि १३१ लघू अशा एकूण १३४ धरणांमध्ये सद्य:स्थितीत केवळ तीन टक्के जलसाठा उरला आहे. दुसरीकडे शहरांसह ग्रामीण भागातील विहिरी आणि कुपनलिकांनीही तळ गाठल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. प्रशासनाने पाणीटंचाई निवारणासाठी लावलेले टँकर भरायलाही अनेक ठिकाणी पाणीच मिळत नसल्याची बिकट स्थिती यामुळे उद्भवली आहे.जिल्ह्यातील वाशिम तालुक्यात एकबुर्जी हा मध्यम प्रकल्प असून ३५ लघूप्रकल्प आहेत. त्यात आजमितीस केवळ १.५० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मालेगाव तालुक्यातील सोनल मध्यम प्रकल्पासह २४ प्रकल्पांमध्ये १.७७ टक्के, कारंजा तालुक्यातील अडाण मध्यम प्रकल्पासह १७ प्रकल्पांमध्ये ८ टक्के पाणीसाठा असून मंगरूळपीर तालुक्यातील १५ लघूप्रकल्पांमध्ये १.३२ टक्के, रिसोडातील १८ प्रकल्पांमध्ये २.४७ टक्के आणि मानोरा तालुक्यातील २४ लघूप्रकल्पांमध्ये ४.२३ टक्के असा सरासरी तीन टक्क्यांच्या आसपास जलसाठा शिल्लक राहिला आहे.पाण्यासंदर्भातील स्थिती अत्यंत विदारक स्थितीत असताना अद्यापपर्यंत पावसाचाही थांगपत्ता नसल्याने अडचणींमध्ये भर पडली आहे. जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये उद्भवलेल्या भीषण पाणीटंचाईमुळे नागरिक पुरते हैराण झाले आहे.पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३५४ विहिरींचे अधिग्रहण केले असून १० गावांमधील ७ नळयोजनांच्या विशेष दुरूस्तीची उपाययोजना करण्यात आली. यासह ५८ गावांमध्ये टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र अधिग्रहित करण्यात आलेल्या अधिकांश विहिरींची पाणीपातळीही खोलवर गेल्याने अनेक ठिकाणी टँकर भरायलाही पाणी मिळेनासे झाले आहे. यामुळे टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकर पोहचायलाही विलंब लागत असल्याची ओरड होत आहे. तथापि, आगामी काही दिवसांत मोठ्या स्वरूपातील तथा संततधार पावसाशिवाय उद्भवलेल्या या बिकट स्थितीवर मात करता येणे शक्य नसल्याचे बोलले जात आहे. १३४ पैकी ११३ प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर!यंदा १६ जूनपर्यंतही पाऊस होण्याचे कुठलेच ठोस संकेत नसल्याने सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील लघू आणि मध्यम अशा एकंदरित १३४ प्रकल्पांपैकी वाशिम तालुक्यातील ३२, मालेगाव तालुक्यातील २०, कारंजा तालुक्यातील १०, मंगरूळपीर तालुक्यातील १४, रिसोड तालुक्यातील १६ आणि मानोरा तालुक्यातील १८ अशा तब्बल ११३ प्रकल्पांची पाणीपातळी सद्या शून्यावर पोहचलेली असून उर्वरित प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची स्थिती देखील चिंताजनक आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाईDamधरण