शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात केवळ २२ टक्के पर्जन्यमान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 14:29 IST

२० जुलैपर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ २२ टक्के पर्जन्यमान झाले असून नदी-नाले, सिंचन प्रकल्पांसह अन्य जलस्त्रोतांच्या पाणीपातळीत कुठलीच वाढ झालेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात चालू वर्षीच्या पावसाळ्यात कुठे दमदार पाऊस; तर कुठे पूर्णत: उघाड, अशी पावसाची स्थिती असून निसर्गाच्या या लहरीपणापुढे नागरिक हतबल झाले आहेत. दरम्यान, २० जुलैपर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ २२ टक्के पर्जन्यमान झाले असून नदी-नाले, सिंचन प्रकल्पांसह अन्य जलस्त्रोतांच्या पाणीपातळीत कुठलीच वाढ झालेली नाही. दुसरीकडे वातावरणातील उष्णतेतही वाढ झाल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत.वाशिम जिल्ह्यात २० जुलै रोजी सरासरी २.२३ मिलीमिटर पाऊस झाला; मात्र हा पाऊस सहा तालुक्यांपैकी केवळ मंगरूळपीर (५.७९ मिलीमिटर) आणि कारंजा (४.९४ मिलीमिटर) या दोन तालुक्यातच अधिक प्रमाणात असून मानोरा तालुक्यात १.८ मिलीमिटर, वाशिम ०.९, मालेगाव ०.९७ आणि रिसोड तालुक्यात ०.५० मिलीमिटर इतक्या कमी प्रमाणात पावसाची नोंद झाली. यातही विशेष म्हणजे ठराविक एकाठिकाणी पाऊस सुरू असताना त्याच्या ४०० ते ५०० मीटरच्या अंतरात पाऊस नसल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला. निसर्गाच्या या लहरीपणाचा जबर फटका खरीपातील पिकांना बसण्यासोबतच पाणीटंचाईचा प्रश्न देखील दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. अपेक्षित पर्जन्यमानात १७० मिलीमिटरने घट!वाशिम जिल्ह्यात १ जून ते २० जुलै या कालावधीत सरासरी ३३० मिलीमिटर पाऊस कोसळणे अपेक्षित असते. यावर्षी मात्र त्यात तब्बल १७० मिलीमिटरने घट झाली असून २० जुलै २०१९ पर्यंत केवळ १६० मिलीमिटर पाऊस झाला आहे. त्याची टक्केवारी जेमतेम २२.५४ आहे.

टॅग्स :washimवाशिमRainपाऊस