शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी गटांसाठी मंजूर निधीच्या १५ टक्केच रक्कम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 17:42 IST

निवड केलेल्या शेतकरी बचत गटांना पुढील कामे करण्यासाठी केवळ १६.५० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.

वाशिम : कोरोनाच्या पृष्ठभूमीवर मंजूर निधीच्या ३३ टक्के मर्यादेत निधी वितरीत करण्याचे धोरण वित्त विभागाने अवलंबिले आहे. दुसरीकडे गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देणे’ या योजनेसाठी मात्र मंजूर निधीच्या १५ टक्के रक्कम देण्यास २४ आॅगस्ट रोजी मंजूरी दिली. २०१७-१८ आणि २०१८-१९ या वर्षात निवड केलेल्या शेतकरी बचत गटांना पुढील कामे करण्यासाठी केवळ १६.५० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र व राज्य शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. राज्यातील शेती उत्पादनात भरीव वाढ होण्यासाठी सामुहिक शेती, शेती करण्याची आधुनिक पद्धती व काटेकोर नियोजनाची आवश्यकता लक्षात घेऊन २०१७-१८ पासून राज्यात ‘गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकºयांच्या गट शेतीस चालना देणे’ ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत राज्यात सन २०१७-१८ मध्ये १९६ शेतकरी गट व २०१८-१९ मध्ये २११ शेतकरी बचत गटांची निवड झाली. पहिल्या टप्प्यात या बचत गटांना प्रशिक्षण, सिंचन सुविधा, यांत्रिकीकरण, काढणीपश्चात तंत्रज्ञान, कृषिमाल प्रक्रिया व पणन यासह अन्य कामांसाठी निधी पुरविण्यात आला. उर्वरीत कामे करण्यासाठी २०२०-२१ मध्ये, मंजूर निधीच्या ३३ टक्केच्या मर्यादेत निधी वितरणास मंजूरी देण्याचा प्रस्ताव कृषी विभागाने वित्त विभागाकडे सादर केला. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर मंजूर निधीच्या १५ टक्के निधी वितरणास वित्त विभागाने हिरवी झेंडी दिली.त्यानुसार ‘गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकºयांच्या गट शेतीस चालना देणे’ या योजनेंतर्गत आता १६.५० कोटी निधी मिळणार आहे. सन २०१७-१८ आणि २०१८-१९ या वर्षात निवड झालेल्या शेतकरी गटांना त्यांच्या प्रकल्प आराखड्यानुसार पुढील कामे या निधीतून करावी लागणार आहेत. यामध्ये अमरावती विभागातील जवळपास १७ गटांचा समावेश आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र