शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अडोळ प्रकल्पात केवळ १२ टक्के जलसाठा; रिसोड, शिरपूरात पाणीप्रश्न होणार गंभीर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 14:34 IST

शिरपूर जैन (वाशिम) : येथून १० किलोमिटर अंतरावर असलेल्या अडोळ प्रकल्पातून ठराविक गावांना पिण्याचे पाणी पुरविले जाते.

ठळक मुद्देगतवर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने अडोळ सिंचन प्रकल्पात पुरेसा जलसाठा होऊ शकला नाही. सद्या या प्रकल्पात उणापूरा १२ टक्के जलसाठा शिल्लक राहिलेला आहे. पाण्याचा काटकसरीने वापर झाल्यास मे च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हा जलसाठा पुरू शकतो.

शिरपूर जैन (वाशिम) : येथून १० किलोमिटर अंतरावर असलेल्या अडोळ प्रकल्पातून ठराविक गावांना पिण्याचे पाणी पुरविले जाते. यंदा मात्र एप्रिलच्या पंधरवड्यातच या प्रकल्पाची पाणीपातळी १२ टक्क्यांपर्यंत खालावली असून आगामी काही दिवस काटकसरीने पाणी वापर न केल्यास रिसोड, शिरपूर यासह रिठद, वाघी बु. या गावांमध्ये ठिकाणी भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचे संकेत वर्तविले जात आहेत.गतवर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने अडोळ सिंचन प्रकल्पात पुरेसा जलसाठा होऊ शकला नाही. यामुळे शेतीच्या सिंचनाकरिता सोडल्या जाणाºया पाण्यावरही जलसंपदा विभागाने लवकरच निर्बंध लादले होते. मात्र, तापत्या उन्हामुळे प्रकल्पातील पाण्याचे होणारे बाष्पीभवन आणि अधूनमधून पिण्याकरिता चार गावांना पाणी सोडले जात असून सद्या या प्रकल्पात उणापूरा १२ टक्के जलसाठा शिल्लक राहिलेला आहे. तो आगामी जून महिन्यापर्यंत पुरणे अशक्य आहे. मात्र, पाण्याचा काटकसरीने वापर झाल्यास मे च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हा जलसाठा पुरू शकतो. त्यामुळे संबंधित गावांमधील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन केले जात आहे. यासंदर्भात समाजातूनही प्रभावी जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे. 

टॅग्स :washimवाशिमDamधरणRisodरिसोडShirpur Jainशिरपूर जैन