रस्त्यावर गटार; वाहनचालक त्रस्त
वाशिम : येथील उड्डाण पुलाचे काम सुरू असून, या पुलाच्या बाजूला वाहतुकीसाठी असलेल्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. आता पावसाचे पाणी या खड्डयांत साचत असल्याने येथे गटार तुंबत असून, चालकांना मार्ग काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे. खड्डे बुजविण्याची मागणी वाहनचालकांतून करण्यात येत आहे.
पोलिसांकडून वाहनांची तपासणी
वाशिम : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. याअंतर्गत वाशिम-मंगरुळपीर मार्गावर अनेक वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी कागदपत्रे नसलेल्या वाहनचालकांना दंड करण्यात आला.
अनेक कार्यालयांत रेन वॉटर हार्वेस्टिंग नाही!
वाशिम : शहरामधील सर्व शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये, व्यापारी संकुले व सर्व खासगी इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुविधा करून ती कार्यरत राहील, याची दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. परंतु अद्याप अनेक ठिकाणी रेन वाॅटर हार्वेस्टिंग सुविधा दिसून येत नाही.