शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

आॅनलाईन सातबारा ठप्प, तलाठीही मिळेना ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 16:36 IST

शिरपूर जैन (वाशिम): खरीप हंगामासाठी पीककर्ज काढण्यास शेतकºयांची लगबग सुरु  आहे. त्यासाठी सातबारा आवश्यक आहे; परंतु आॅनलाईन सातबाराचे संकेतस्थळ ठप्प असल्याने शेतकरी आॅफलाईन सातबारासाठी तलाठ्यांकडे धाव घेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क शिरपूर जैन (वाशिम): खरीप हंगामासाठी पीककर्ज काढण्यास शेतकºयांची लगबग सुरु  आहे. त्यासाठी सातबारा आवश्यक आहे; परंतु आॅनलाईन सातबाराचे संकेतस्थळ ठप्प असल्याने शेतकरी आॅफलाईन सातबारासाठी तलाठ्यांकडे धाव घेत आहेत. त्यात तलाठीही जागेवर मिळेनासे झाल्याने शेतकºयांची मोठी कोंडी झाली आहे. मालेगाव तालुक्यातील शिरपूर परिसरातील तीन तलाठी सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंतही कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे शेतकºयांना मनस्ताप सहन करावा लागला. जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या शिरपूर अंतर्गत एका मंडळ अधिकाºया व्यतीरिक्त शिरपूरच्या तीन भागांसह विविध गावे मिळून ९ तलाठी कार्यरत आहेत. या तलाठ्यांकडे संबंधित गावांतील हजारो ग्रामस्थ आणि शेतकºयांच्या कामकाजाची जबाबदारी आहे. तथापि, यातील काही तलाठी आपल्या जबाबदारीबाबत फारसे गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. याची प्रचिती सोमवार ६ मे रोजी आली. सद्यस्थितीत शेतकरी खरीप हंगामासाठी पीककर्ज काढण्यास धडपडत आहेत. त्यासाठी त्यांना शेतीच्या विविध कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागत असून, ही कागदपत्रे तलाठ्यांकडूनच मिळू शकतात. सातबाराचे दस्तऐवज आॅनलाईन झाले असले तरी, सातबाराचे संकेतस्थळच ठप्प असल्याने शेतकºयांना आॅफलाईन सातबारासाठी तलाठ्यांकडे धाव घ्यावी लागत आहे. सोमवार ६ मे रोजी अनेक शेतकरी आॅफलाईन सातबारासाठी तलाठी कार्यालयावर दाखल झाले; परंतु १२ वाजून गेले तरी,  शिरपूर भाग २ चे तलाठी येथील पी. एस. अंभोरे, वसारीचे तलाठी एन.एम. केकन आणि शेलगाव बोंदाडेचे तलाठी बी. आर वाघ हे कार्यालयात फिरकलेच नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे विविध कामासाठी आलेल्या शेतकºयांना मोठा मनस्ताप आणि आर्थिक भुर्दंडही त्रास सहन करावा लागला. विविध गावांतून पैसे खर्च करून तलाठी कार्यालयात यायचे. त्या ठिकाणी तासनतास प्रतिक्षा करायची, त्यानंतही काम होत नसेल, तर शेतकºयांनी करावे काय, असा प्रश्न संबंधित गावातील शेतकºयांनी केला असून, याकडे मंडळ अधिकारी तथा तहसिलदारांनी तात्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

मागील कित्येक दिवसांपासून बंद असलेल्या आॅनलाईन सातबारा मिळत नसल्याने मिळालेल्या आॅफलाइन सातबारावर पीकर्ज घेण्यासाठी तलाठ्यांची स्वाक्षरी आवश्यक आहे. त्यामुळे तलाठी कार्यालयात आलो; परंतु स्वाक्षरी करण्यासाठी संबंधित तलाठी कार्यालयात उपस्थित नसल्याने आमची दोन वेळेची चक्कर वाया गेली. - भालचंद्र देशमुख, शेतकरी  शिरपूर   

 माझी शेती वाकद शेत शिवारामध्ये आहे. मलासुद्धा आॅफलाईन सातबारावर तलाठ्याची स्वाक्षरी घ्यायची होती. मात्र तलाठी बी.आर वाघ कार्यालयात उपस्थित नसल्याने मला स्वाक्षरी मिळू शकली नाही.   - कमल कव्हर  शेतकरी, वाकद  

शिरपूर भाग नंबर दोनचे तलाठी पी. एस. अंभोरे व वसारी येथील एन. एम. केकन हे दोन्ही तलाठी दुपारी एक वाजेपर्यंत उपस्थित नव्हते. त्यामुळे निश्चितच शेतकºयांना त्रास झाला. याविषयी वरिष्ठ स्तरावर अहवाल पाठवून, त्यांच्या निर्देशानुसार कार्यवाही होईल.-घनश्याम दलाल मंडळ अधिकारी शिरपूर जैन.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीonlineऑनलाइन