शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 15:08 IST

कृषी विज्ञान केंद्र वाशिमच्या शास्त्रज्ञांनी खरीप हंगामाच्या पृष्ठभूमीवर शेतकऱ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन सुरू केले आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: सद्यस्थितीत कोरोना विषाणू संसर्गाने जगभर थैमान घातले आहे. त्यामुळे या रोगला प्रतिबंध घालण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली आहेत. त्यासाठीच  लॉक डाऊन  सुरू आहे. अशात शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन अशक्य आहे. त्यामुळेच पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठासह कृषी विज्ञान केंद्र वाशिमच्या शास्त्रज्ञांनी खरीप हंगामाच्या पृष्ठभूमीवर शेतकऱ्यांना आॅनलाईन मार्गदर्शन सुरू केले आहे. यासाठी ऑडिओ कॉन्फरन्सचा आधार घेतला जात आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने शेतकरी मशागतीची कामे समुहाने एकत्र येऊन करू शकत नाहीत. तथापि, कृषी निविष्ठांची जुळवाजुळव करून ठेवण्यासाठी नियोजन करण्याचा हा कालावधी. या खरीप हंगामात करतात शास्त्रोक्त शिफारशीत तंत्रज्ञानावर आधारित कमी खर्चाच्या निविष्ठांची निवड करून तसेच शिफारशीत कमी खर्चाचे तंत्रज्ञान अंगीकार करून शेतकरी बंधूनी निव्वळ नफा वाढवावा, हा उद्देश समोर ठेवून वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि कृषि विज्ञान केंद्र वाशिम यांनी संयुक्तरित्या शेतकरी ऑडिओ कॉन्फरन्सचे आयोजन ६ मे रोजी केले. त्यात महिनाभरावर असलेल्या खरीप हंगामात बियाण्याची, जातीची निवड, बियाण्याला बीज प्रक्रिया कशी करावी उगवण क्षमता तपासणी आदिंबाबत डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोलाचे कृषी विद्यावेत्ता डॉ. विनोद खडसे यांनी मार्गदर्शन केले. तसेच कृषी विज्ञान केंद्र,वाशिमचे कीटक शास्त्रज्ञ राजेश डवरे यांनीखरीप पिकातील प्रतिबंधात्मक पीक संरक्षण तंत्रज्ञान या विषयावरऑडिओ कॉन्फरन्स मध्ये सहभागी शेतकºयांना मार्गदर्शन केले. ३१ गावांतील शेतकºयांचा सहभागखरीप हंगामाच्या पृष्ठभूमीवर नियोजनाबाबत मार्गदर्शनासाठी पीकेव्ही आणि कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या ऑडिओ कॉन्फरन्समध्ये ३१ गावांतील शेतकरी बांधवांनी सहभाग नोंदवला. शेतकºयांनी आपल्या घरातच बसून फोनद्वारे, खरीप पूर्व नियोजन प्रतिबंधात्मक कीड व रोग व्यवस्थापन तसेच कमी खर्चाचे प्रतिबंधात्मक पीक संरक्षण तंत्रज्ञान याबाबत प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. या संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयन विलास सवाणे, यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी