लोकमत न्यूज नेटवर्कपिंजर : पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पातूर नंदापूर येथे किरकोळ कारणावरून एका इसमावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. यामध्ये एक गंभीर तर दोन जण जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजता घडली. पातूर नंदापूर येथील सै.अन्सार सै.जब्बार यांनी पिंजर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की घरासमोर असलेल्या नालीचे पाणी रस्त्यावर काढण्यावरून शेजारी राहत असलेल्या कादर खा सत्तार खा यांनी माझ्याबरोबर वाद घातला, तसेच सात ते आठ लोकांना सोबत घेऊन माझ्यावर कुऱ्हाड व पाइपने हल्ला केला. यावेळी निसार शेख व शे.जावेद शे.सईद यांनाही मारहाण करण्यात आली. जखमींवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असून, सै. अन्सार यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
क्षुल्लक कारणावरून एकावर कुऱ्हाडीने हल्ला
By admin | Updated: July 2, 2017 20:29 IST