शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाखावरील भरलेली रक्कम शासन करणार परत : आमदार पाटणी यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 16:21 IST

वाशिम :   छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत कुटुंबाच्या एकुण थकबाकीच्या आधारे एकरकमी परतफेड लाभासाठी भरलेली दीड लाखवरील रक्कम शासनाच्यावतीने परत करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांनी दिली आहे.

ठळक मुद्देयापुर्वी प्रती कुटुंब दीड लाख मयार्देपर्यंत कर्जमाफीचा लाभ अनुज्ञेय होता.यापुढे अर्जदार कुटुंबातील प्रत्येक पात्र कर्जदार सदस्यास दीड लाखापर्यंत  कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे.परतफेड लाभासाठी भरलेली दीड लाखवरील रक्कम शासनाच्यावतीने परत करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :   छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत कुटुंबाच्या एकुण थकबाकीच्या आधारे एकरकमी परतफेड लाभासाठी भरलेली दीड लाखवरील रक्कम शासनाच्यावतीने परत करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांनी दिली आहे. १० आॅगष्ट २०१८ रोजी महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने हा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.      योजनेच्या प्रचलित निकषानुसार कुटुंबाच्या सर्व कर्जदार सदस्यांच्या पात्र कर्जखात्यांची एकुण थकबाकी दीड लाखापेक्षा जास्त आहे , अशा अर्जदार कुटुंबातील पात्र सदस्यांनी दीड लाखावरील रक्कम संबंधित बँकेत जमा केल्यास त्यांना शासनाच्यावतीने प्रती कुटुंब दीड लाख मयार्देपर्यंत लाभ देण्यात येत होता. सोबतच्या शासन निर्णयान्वये सुधारित बदलानुसार कर्जमाफीबाबतच्या इतर निकषास अधिन राहुन यापुर्वीच्या प्रती कुटुंब दीड लाखापर्यंत कर्जमाफीच्या लाभाऐवजी यापुढे अर्जदार कुटुंबातील प्रत्येक पात्र कर्जदार सदस्यास दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. सदर बदलामुळे यापुर्वी लाभार्थ्यांच्या याद्या निश्चित करतांना करण्यात आलेल्या लाभाच्या गणनेत बदल करण्यात येऊन कुटुंबातील प्रत्येक पात्र सदस्यांच्या वैयक्तिक कर्जखात्यांच्या थकबाकीची पुनर्गणना करण्यात येणार आहे. प्रत्येक सदस्यांस दीड लाखापर्यंंत कर्जमाफी, एकरकमी कर्जपरत फेड योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. पुनर्गणनेव्दारे लाभाचे निश्चितीकरण केल्यानंतर कुटुंबातील वैयक्तीक कर्जदार सदस्यांची पात्र थकबादीची रक्कम दीड लाखापेक्षा कमी असल्यास अशा परिस्थितीत योजनेच्या यापुर्वीच्या निकषानुसार कुटुंबाच्या एकुण थकबाकीच्या आधारे एकरकमी परतफेड योजनेच्या लाभासाठी भरलेली दीड लाखावरील रक्कम शासनाच्यावतीने परत करण्यात येईल. तसेच बदललेल्या निकषानुसार कर्जदार वैयक्तीक सदस्यांची थकबाकीची रक्कम दीड लाखाच्या आत असल्यास आणि लागु असेल तेथे अशा सदस्यांकडील पुनर्गठीत कर्जाची उर्वरित हप्त्यांच्या देय असलेल्या रकमेसह दीड लाख या मयार्देपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार असल्याची माहितीही आमदार राजेंद्र पाटणी यांनी दिली. 

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरीRajendra Patniराजेंद्र पाटणी