शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

ई-पीक नोंदणीपासून दीड लाखांवर शेतकरी दूरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 11:42 IST

E-crop registration : नोंदणी वाढविण्यासाठी सुरू असलेला महसूल विभागाचा आटापिटा कुचकामी ठरत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  ई-पीक पाहणी उपक्रमांतर्गत जिल्ह्यात २ लाख ७२ हजार ९८० खातेदार शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत १ लाख ३ हजार ६८८ शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची ऑनलाईन नोंदणी केली आहे; तर १ लाख ६९ हजार ९८० शेतकरी अद्यापही नोंदणी प्रक्रियेपासून दूरच आहेत. अनेकांना हा विषयच कळलेला नसून ऑनलाईन प्रक्रियेविषयी काहीजण अनभिज्ञ आहेत. त्यामुळेच नोंदणी वाढविण्यासाठी सुरू असलेला महसूल विभागाचा आटापिटा कुचकामी ठरत आहे.ई-पीक पाहणीमध्ये मोबाईल ॲपद्वारे शेतकरी स्वतः शेतातील पिकांची नोंद करू शकणार आहेत. त्यामुळे गावनिहाय पिकांची अचूक आकडेवारी उपलब्ध होणार आहे. शेतकरी प्रत्यक्ष शेतात जाऊन मोबाईल ॲपद्वारे पिकांचे फोटो अपलोड करु शकतील, या ॲपमध्ये त्या क्षेत्राच्या अक्षांश व रेखांशाची नोंद होणार आहे. शेतकऱ्यांकडून नोंदविण्यात आलेल्या माहितीची तलाठ्यांमार्फत पडताळणी करून त्याची नोंद सातबारा उताऱ्यामध्ये घेतली जाणार आहे. त्यामुळे हा उपक्रम महत्त्वाकांक्षी मानला जात आहे. असे असले तरी अनेक गोरगरीब शेतकऱ्यांकडे अद्यापही ॲन्ड्राॅईड मोबाईल नाहीत, ते कसे हाताळायचे, याची जाण त्यांना नाही. ग्रामीण भागात मोबाईलच्या नेटला पुरेशी गती मिळत नाही. पिकांचे फोटो काढलेही जातील; मात्र ते मोबाईल ॲपव्दारे अपलोड कसे करायचे, या प्रश्नाने अनेक शेतकऱ्यांना ग्रासले आहे. त्यामुळे अद्याप १ लाख ६९ हजार ९८० शेतकरी नोंदणीपासून दूर असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :washimवाशिमRevenue Departmentमहसूल विभागFarmerशेतकरी