शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जलशुद्धीकरणात दीड  कोटी लिटर पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 15:12 IST

जलशुध्दीकरणामुळे ५० ते ७० टक्के पाणी वाया जाते.  या प्रकल्पातुन वाया जाणाºया पाण्याची गणना लिटर्स मध्ये केली असता तालुक्यात सुरू असलेल्या प्रकल्पातून दीड कोटी लिटर्स पाणी वाया जात आहे.

-  दिवाकर इंगोले लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा :  जल शुद्धीकरण व जलशीतलीकरण या नादात सत्तर टक्के जल अपव्यय होत आहे. असे जलशुद्धीकरण प्रकल्पाची संख्या शहर व ग्रामीण भागासह १५० अशी आहे. या प्रकल्पातून सत्तर टक्के पाणी वाया जात आहे. म्हणजे एक ग्लास शुद्ध व थंड पाणी पिण्यासाठी चार ग्लास पाणी वाया जाते. पाणी टंचाईच्या काळात हे अपव्यय अतिशय गंभीर असून मुख्याधिकारी, तहसीलदार,उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी यांनी या प्रकाराची दखल घेऊन जलपूर्णभरण प्रकिया राबविणे आवश्यक आहे.पाण्याचे भीषण संकट टाळण्यासाठी जल ही राष्टीय संपत्ती घोषित झाल्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळन्यासाठी सक्तीची कार्यवाहि करणे आवश्यक आहे. कारंजा तालुक्यात ९१ ग्राम पंचायती असून त्या अंतर्गत १३४ गावे आहेत. शहरात ३२ व ग्रामीण विभागात १२८ जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. त्यामुळे ग्रामीण व नागरी परिसरात शुभकार्य प्रसंगी हेच पाणी वापरले जाते. तालुक्यातील सर्व तुष्णातुप्ती केंद्र व व्यापार व्यवसाय प्रतिष्ठाने, औद्योगिकीकरण संस्था, तसेच शासकीय कार्यालय, अशासकीय कार्यालय,घरगुती  उपयोगाकरिता याच पाण्याचा वापर होतो त्यामुळे या पाण्याची मागणी वाढली आहे.      परंतु ही मागणी पूर्ण करताना जलशुध्दीकरणामुळे ५० ते ७० टक्के पाणी वाया जाते.  या प्रकल्पातुन वाया जाणाºया पाण्याची गणना लिटर्स मध्ये केली असता तालुक्यात सुरू असलेल्या प्रकल्पातून दीड कोटी लिटर्स पाणी वाया जात आहे.या वाया जाणाºया पाण्याचे सक्तीचे जलपूर्णर्भरण करून, हेपाणी पुन्हा जमिनीच्या उदरात सोडता येईल. तसेच दुष्काळग्रस्त भीषण पाणी टंचाई असलेल्या गावामध्ये  या पाण्याचा उपयोग पेय जल सोडून मुके पाणी व ईतर वापरासाठी उपयोगात आणता येईल. प्रशासनाने प्रत्येक प्रकल्प धारकांसाठी वाया जाणा?्या पाण्यासाठी टाके बांधाने शक्तीचे करावे. त्या टाक्यातून पाणी प्रशासनाने टँकर व्दारे उचल करून या पाण्याचा वापर दुष्काळी गावात पिण्याचे पाणी वगळून इतर वापरासाठी उपयोग  करावा. जलशुद्धीकरनाच्या नावावर तालुक्यात दीड  कोटी पाण्याचा अपव्यय प्रशासनाने दखल घेतल्यास दुष्काळग्रस्त गावाला पाणी पुरवठा होऊ शकतो व वाया जाणारे पाण्याचे नियोजनही योग्यरित्या केल्या जावू शकते, याकरिता पुढाकाराची गरज आहे एवढे मात्र नक्की! वाया जाणारे पाणी जनावरांसाठी     वाया जाणाºया पाण्याबाबत आम्ही  गंभीर असून परिसरातील लोकांना जनावारासाठी व वापरासाठी पाणी विनामूल्य उपलब्ध करून देत असल्याचे एम कुलचे संचालक जुनेद मराछिया यांनी सांगितले. असाच प्रयोग सर्वांनी केला तर अपव्यय होणाºया पाण्याचा सदुपयोग होईल. कारंजा शहरातील जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी करून जलपूर्णर्भरण प्रकिया सक्तीचे करण्यात येईल. - डॉ अजय कुरवाडे, मुख्याधिकारी नगर परिषद कारंजा,आरोग्याच्या दृष्टीने पाण्याचे शुद्धीकरण महत्वाचे असले तरी वाया जाणाºया पाण्याचा सदुपयोग कसा करता येईल यांचे प्रशासनाने उचित नियोजन करणे गरजेचे आहे. - डॉ निलेश हेडा, पर्यावरण तज्ज्ञ कारंजा जलशुद्धीकरण करतांना पाण्याचा अपव्यय ही गंभीर बाब असून यांचे जलव्यवस्थापणाव्दारे नियंत्रण व्हायला हवे.- अ‍ॅड . विजय बगडे,  माजी नगराध्यक्ष कारंजा

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाईKaranjaकारंजा