शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

जागतिक शौचालय दिनानिमित्त वाशिम जिल्ह्यात गावोगावी ‘कृती कार्यक्रम’  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 2:59 PM

वाशिम : जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून प्रत्येक तालुक्यातून किमान पाच अशा एकूण २५ ते ३० गावांत हगणदरीमुक्तीबाबत  प्रत्यक्ष कृती कार्यक्रम घेण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी जिल्हा स्वच्छता व पाणी कक्ष तसेच गटविकास अधिकाºयांना केल्या.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा उपक्रम शोष खड्ड्यांसाठी श्रमदान 

वाशिम : जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून प्रत्येक तालुक्यातून किमान पाच अशा एकूण २५ ते ३० गावांत हगणदरीमुक्तीबाबत  प्रत्यक्ष कृती कार्यक्रम घेण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी जिल्हा स्वच्छता व पाणी कक्ष तसेच गटविकास अधिकाºयांना केल्या.जिल्हा हगणदरीमुक्त करण्यात काही गावांतील नागरिकांचे असहकार धोरण कारणीभूत ठरत आहे. वारंवार सूचना, विनंती, पाठपुरावा करूनही रिसोड, मानोरा, वाशिम, मालेगाव तालुक्यातील काही नागरिकांचे म्हणावे तसे सहकार्य मिळत नसल्याने अद्याप ४५ हजार शौचालयांचे बांधकाम होऊ शकले नाही. मंगरूळपीर तालुक्यात ४७०० शौचालय बांधकाम बाकी आहे. जागतिक शौचालय दिनी उद्दिष्टांपासून कोसोदूर असलेल्या गावांत कृती कार्यक्रम घेऊन व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी केल्या. गावात शौचालयाचे बांधकामांना सुरुवात करणे तसेच सुरु असलेल्या कामांचा शेवट करणे अर्थात देयक अदा करणे आणि त्याची आॅनलाईन नोंद घेणे, शौचालयाच्या शोष खड्यांसाठी श्रमदान करणे तसेच शक्य असेल तेथे जेसीबी लावणे, कामे सुरु असल्यास गवंडी, मिस्री यांना तांत्रिक मार्गदर्शन करणे, लोकप्रतिनीधिंच्या हस्ते प्रतिकात्मक शौचालय बांधकाम, उदघाटन, शौचालय बांधणाºया कुटुंबाचा सत्कार आदी उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे. गावात असलेल्या स्वच्छता प्रेरकांना या कार्यक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे. या उपक्रमात जिल्हा किंवा तालुका स्तरावरील सर्व लोकप्रतिनिधींचा सहभाग व पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. निवडलेल्या गावात पंचायत समितीचे  सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी होतील याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचनाही गणेश पाटील यांनी केल्या आहेत. निवडलेल्या गावांसह तालुक्यातील इतर गावांची हगणदरीमुक्त घोषित होण्याची तारीख निश्चित करणे, कमी उद्दिष्ट असलेल्या गावांना या दिवशी १९ नोव्हेंबरला हगणदरीमुक्त म्हणून घोषित करण्याचे नियोजन करावे, काही शंका असल्यास थेट उपमुख्य कार्यकारी अधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकाºयांशी संपर्क साधावा, असे आवाहनही गणेश पाटील यांनी केले.