शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

कर्ज योजनेसाठी १३० लाभार्थींचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 2:47 PM

वाशिम जिल्ह्यासाठी १ लाख रुपयाच्या आतील व्यवसायासाठी ७५ तर १ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कमेच्या व्यवसायाकरिता ५५ लाभार्थींचे उद्दिष्ट मिळाले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्यावतीने राष्ट्रीयकृत बँकांमार्फत राबविण्यात येणाºया कर्ज योजनेकरिता वाशिम जिल्ह्यासाठी १ लाख रुपयाच्या आतील व्यवसायासाठी ७५ तर १ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कमेच्या व्यवसायाकरिता ५५ लाभार्थींचे उद्दिष्ट मिळाले आहे. या कर्ज योजनेत महामंडळाचा १५ टक्के तर अर्जदाराचा १० टक्के सहभाग असून बँकेचा ७५ टक्के सहभाग राहणार आहे. कर्ज योजनेतून १ लाख रुपयाच्या आतील व्यवसायाकरिता पीठ गिरणीसाठी ३, पेपर डिश किंवा ज्यूस सेंटरसाठी ३, दुग्ध व्यवसाय युनिटसाठी ३०, मंडप डेकोरेशन व लाउडस्पीकर केंद्रासाठी ५, मळणी युनिटसाठी ३, आॅटो वर्कशॉपसाठी १०, किराणा दुकानासाठी ५, कापड दुकानासाठी ३, इलेक्ट्रिक दुकानासाठी ३, पापड, मसाला, शेवाळ्या या खाद्य उद्योगासाठी ५ आणि कटलरी दुकानासाठी ५ असा एकूण ७५ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट आहे. तसेच १ लाख रुपयांच्यावरील व्यवसायामध्ये वीटभट्टी युनिटकरिता ५, कापड दुकानाकरिता ९, डीटीपी संगणक किंवा झेरॉक्स सेंटरकरिता ५, हॉटेल किंवा ढाबाकरिता ५, स्टेशनरी दुकान ५, खत बियाणे दुकानाकरिता ५, ट्रॅक्टर ट्रॉली करिता ५, पॉवर ट्रिलर (लहान) करिता ५, मालवाहू मिनी ट्रककरिता २, प्रवासी वाहनाकरिता ५, मालवाहू रिक्षाकरिता २ व औषधी दुकानाकरिता २ याप्रमाणे ५५ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट आहे. कर्ज वाटप योजनेसाठी विहित नमुन्यातील अर्ज महामंडळाच्या यवतमाळ येथील कार्यालयातून प्राप्त करून घेण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०१९ पर्यंत असून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ आॅगस्ट २०१९ पर्यंत आहे. वाशिम जिल्ह्यातील इच्छुकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या यवतमाळ शाखा व्यवस्थापकांनी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना