शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पोषण पंधरवडा अभियानातून बालकांच्या आरोग्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 13:38 IST

वाशिम : महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडीतील बालकांच्या आरोग्याचा प्रश्न गांभीर्याने घेतला असून, त्याअनुषंगाने ८ ते २२ मार्च या ...

वाशिम : महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडीतील बालकांच्या आरोग्याचा प्रश्न गांभीर्याने घेतला असून, त्याअनुषंगाने ८ ते २२ मार्च या दरम्यान राज्यभरात पोषण पंधरवडा राबविण्यात येणार आहे. बालकांना पुरक पोषण आहार देणे, रक्तक्षय, कुपोषणमुक्ती यासह आरोग्यविषयक धडे देण्यासाठी वाशिम जिल्ह्यासह राज्यातील ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्रावर जनजागृती केली जाणार आहे. बदलती जीवनशैली, वातावरणातील बदल, पोषण आहारासंदर्भात अचूक माहितीचा अभाव यासह विविध कारणांमुळे बालकांमध्ये रक्तक्षय, कुपोषण यासह अन्य आजार जडत आहेत. अंगणवाडी केंद्रातील बालकांच्या आरोग्याचा प्रश्न महिला व बालकल्याण विभागाने गांभीर्याने घेतला असून, पालकांमध्ये जनजागृती करणे आणि बालकांच्या आरोग्याची तपासणी करणे या दुहेरी उद्देशाने ८ मार्च ते २२ मार्च या दरम्यान वाशिमसह राज्यात पोषण पंधरवडा राबविण्यात येणार आहे. कोणत्या दिवशी कोणते उपक्रम घ्यावे, याचा नियोजनबद्ध कार्यक्रमही जिल्हास्तरीय यंत्रणेला प्राप्त झाला आहे. महिला दिनी अर्थात ८ मार्च रोजी पोषण पंधरवडा अभियानाचे प्रकल्पस्तर, ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्रस्तरावर उदघाटन आणि महिला मेळावा घेतला जाणार आहे. ९ मार्च रोजी गावस्तरावर लहान बाळांना पुरक आहार देणे, कुपोषणमुक्तीबाबत पालकांचे कर्तव्य याबाबत पालक मेळावा होणार आहे. १० मार्चला गाव, तालुका व जिल्हास्तरावर सायकल रॅली किंवो पोषण रॅली, ११ मार्चला रक्तक्षय तपासणी शिबिर, १२ मार्चला हात धुण्याचे प्रात्यक्षिक व स्वच्छतेचे महत्व, १३ मार्चला गृहभेटीद्वारे आरोग्यविषयक जनजागृती, बालकांना लोहयुक्त गोळ्यांचे वाटप याप्रमाणे २२ मार्चपर्यंत आरोग्यविषयक उपक्रम राबवून बालकांचे आरोग्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न महिला व बालकल्याण विभागातर्फे केला जाणार आहे. 

 

शासनाच्या निर्देशानुसार वाशिम जिल्ह्यात पोषण पंधरवडा अभियान राबविण्यात येणार आहे. नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी केली असून, ग्रामपंचायत, प्रकल्पस्तर, अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा यांच्यासह सर्व संबंधितांना यासंदर्भात सूचनाही देण्यात आल्या.- नितीन मोहुर्लेउपमुख्य कार्यकारी अधिकारी,महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद वाशिम.

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्य