शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
3
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
4
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
5
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
6
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
7
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
8
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
9
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
10
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
11
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
12
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
13
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
14
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
15
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
16
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
17
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
18
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
19
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...

नाविण्यपूर्ण उपक्रमामुळे वाढली विद्यार्थी संख्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 15:03 IST

विविध उपक्रमांमुळे आता शाळेच्या पटसंख्येचा आलेख चढता आहे. सन २०१८-१९ मध्ये ८४ आणि २०१९-२० मध्ये ९१ पटसंख्या आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : चार वर्षांपूर्वी विद्यार्थी संख्या कमी असणाऱ्या मालेगाव तालुक्यातील वारंगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नाविण्यपूर्ण उपक्रमासह जादा शिकवणी वर्गावर भर देण्यात आला. याचे सकारात्मक परिणाम समोर आले असून, दरवर्षी विद्यार्थी संख्या वाढत असल्याचे दिसून येते.खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळेत फारशा भौतिक सुविधा उपलब्ध नसतात, असे म्हटले जाते. पूर्वीच्या तुलनेत आता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही लोकवर्गणी व शासन निधीमधून भौतिक सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. मालेगाव तालुक्यातील वारंगी येथील जिल्हा परिषद शाळेतही लोकवर्गणी व शासन निधीतून भौतिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. आकर्षक रंगरंगोटी तसेच निसर्गरम्य वातावरण निर्मिती करण्यात आली. वारंगी येथे वर्ग पहिली ते सातवीपर्यंत शाळा असून येथील पटसंख्या सन २०१७-१८ मध्ये ७६ होती. शाळेमध्ये विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. अध्यापनाला तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली. नवोदय प्रवेश परीक्षा तसेच शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विशेष शिकवणी वर्ग घेण्यात येतात. डिजिटल शाळा असल्याने विद्यार्थ्यांना हसत-खेळत शिक्षण मिळणेही सुलभ झाले आहे. विविध उपक्रमांमुळे आता शाळेच्या पटसंख्येचा आलेख चढता आहे. सन २०१८-१९ मध्ये ८४ आणि २०१९-२० मध्ये ९१ पटसंख्या आहे. प्रोजेक्टरच्या माध्यमातून अध्यापन केले जात असल्याने ते समजण्यास सुलभ जात आहे.विविध स्पर्धांवर भरजिल्हा परिषद वारंगी शाळेत विविध स्पर्धा घेण्यात येतात. विविध स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, स्टेज डेअरिंग, व्यावहारिक ज्ञान, अंगभूत गुणांना व्यासपिठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. रांगोळी, हस्ताक्षर, कागदी वस्तू बनविणे, गाव स्वच्छता मोहिमेत सहभाग, वेशभूषा, वर्ग सजावट आदी स्पर्धा घेतल्या जातात. विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून २०१८-१९ मध्ये १८ हजार रुपयांची बक्षीस प्राप्त झाली.गावकरी मंडळी, पालक व शिक्षकांच्या सहकार्यामुळेच शाळेची प्रगती व विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास साधला जात आहे. नाविण्यपूर्ण उपक्रमावर भर आहे.- गजानन बळी, मुख्याध्यापकशिकविण्याबरोबरच विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यात मुख्याध्यापक, शिक्षकांची मोलाची भूमिका आहे.- विजय हेंबाडे, पालक

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाStudentविद्यार्थी