शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
2
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
3
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
4
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
5
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
6
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
7
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
8
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
9
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
10
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
11
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
12
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
13
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
14
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
15
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
16
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
17
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
18
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
19
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

वन्यप्राण्यांचा उच्छाद वनविभागाच्या नियंत्रणाबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 14:09 IST

पिकांची मोठी हानी होत असतानाच शेतकरी, शेतमजुरांचा जीवही धोक्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्या तुलनेत जंगलात चाऱ्याची उपलब्धता नाही. त्यामुळे वन्यप्राणी शेतशिवार आणि लोकवस्तीत धाव घेत आहेत. यात पिकांची मोठी हानी होत असतानाच शेतकरी, शेतमजुरांचा जीवही धोक्यात येत आहे. तथापि, तोकडा निधी, जटील अटीमुळे वनविभागालाही या प्रकारावर नियंत्रण मिळविणे अशक्य झाले आहे. वनपरिक्षेत्रातील प्राण्यांना रोखण्यासाठी लावलेले कुंपणही तकलादू आहेत. त्यामुळेच वनविभागाकडे पिकहानीसह मनुष्यहानीबाबत दाखल होणाºया प्रस्तावांची संख्या वाढतच आहे.जिल्ह्यात वाशिम वनविभागांतर्गत वाशिम, कारंजा, मानोरा आणि मालेगाव असे चार वनपरिक्षेत्र असून ४१ हजार ९७१.६६ हेक्टर जमिनीवर प्रादेशिक वन परिक्षेत्राचा विस्तार आहे. या प्रादेशिक वनपरिक्षेत्रात हरीण, काळविट, निलगाय, माकड, भेकर, रानडुक्कर, अस्वल, तरस, बिबट, ससा, कोल्हा, रानमांजर, सायाळ आदि वन्यप्राण्यांचे अस्तित्व आहे. आता वाशिम जिल्ह्यातील वनक्षेत्रात वाढ झालेली नसली तरी, वन्यप्राण्यांच्या संख्येत खुप वाढ झाली आहे. मर्यादीत असलेल्या वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यासाठी चारा, पाण्याची सोय नसल्याने हे प्राणी लोकवस्ती आणि शेतशिवारात धाव घेत आहेत. त्यामुळे पिक नुकसानाच्या घटनांसह पाळीव प्राण्यांसह मानवावरही या प्राण्यांच्या हल्ल्यांचे प्रमाणही वाढले आहे. या प्राण्यांना लोकवस्तीपासून दूर आणि वनपरिक्षेत्रातच राहण्यास बाध्य करण्यासाठी वनविभागाकडून पुरेसे प्रयत्न होत नाहीत. प्रत्यक्षात मर्यादत निधी आणि जटील अटींमुळे वनविभागाच्या प्रयत्नांवरही मर्यादा येत आहेत. वन्यप्राण्यांवर नियंत्रणासाठी वनपरिक्षेत्रालगत कुंपण बांधण्यासह मोठे खंदक खोदण्याची जबाबदारी वनविभागाकडे आहे; परंतु सोहळ काळविट अभयारण्यातील काही भाग आणि काटेपूर्णा अभयारण्यातील काही भाग वगळता इतर कोठेही कुंपण वा खंदक खोदण्यात आलेले नाहीत. त्यातही सोहळ काळविट अभयारण्यातील कुंपण हे तकलादू असल्याने त्याची पार दैना झाली आहे. पीक नुकसानाच्या प्रकारांत वाढवाशिम जिल्ह्यात जानेवारी ते मे दरम्यानचा काळ सोडला, तर इतर सर्वच महिन्यात शेतशिवारात पिके उभी असतात. याच पिकांवर रानडुक्कर, माकडे, निलगाई आणि हरणांचे कळप ताव मारून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करतात. यंदा जुन महिन्यापासून आजवर अवघ्या अडिच महिन्यांतच पीक नुकसान झाल्यामुळे वनविभागाकडे तब्बल २९४ प्रस्ताव दाखल झाले आहेत. या प्रकरणांना मंजुरीही देण्यात आली आहे. तथापि, या नुकसानातील भरपाईचे प्रमाण नगण्य असल्याने सर्व शेतकºयांना मिळून केवळ ५ लाख ८६ हजार रुपये मिळाले आहेत. वन्यप्राण्यांच्या मानवावरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले असून, चार महिन्यांत ६ लोक वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. तर सहा पाळीव प्राण्यांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात बळी गेला आहे.

बिबट्याचा संचारही वाढलावाशिम जिल्ह्यांतर्गत येणाºया वनपरिक्षेत्रांतर्गत बिबट्याचे अस्तित्व असून, या हिंस्त्रप्राण्याचाही शेतशिवारात संचार वाढल्याचे दिसत आहे. मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव, कारंजा तालुक्यातील एका गावासह मालेगाव तालुक्यात बिबट्याचे वारंवार दर्शन शेतकरी शेतमजुरांना घडत आहे. मालेगाव तालुक्यात किन्हीराजा ते कवरदरी या मार्गावरील बाबनदरीच्या घाटात बिबट्याने रोहीची शिकार करून ठार मारल्याची घटना ४ आॅगस्ट रोजी घडली. यामुळे बिबट्याच्या भितीने किन्हीराजासह या मार्गावरील कवरदरी, पिंपळशेंडा, वाडी रामराव आदी गावांमधील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वनपरिक्षेत्राच्या तुलनेत वन्यप्राण्यांची संख्या वाढली आहे. हे वन्यप्राणी जंगलातच थांबावेत म्हणून वनपरिक्षेत्रालगत खंदक खोदणे, कुंपण उभारणे आदि कामे करता येतात; परंतु यापुढे शेतशिवारातील वन्यप्राण्यांचा संचार रोखण्यासाठी कुठलीही उपाय योजना आम्हाला करणे शक्य नाही आणि त्याच्या काही सुचनाही नाहीत. पीक नुकसान किं वा मनुष्यहानीबाबत दाखल प्रस्तावांना निर्धारित निकषानुसार मदत केली जाते.-किशोर येळे, सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू)प्रादेशिक वनविभाग वाशिम

टॅग्स :washimवाशिमwildlifeवन्यजीवforest departmentवनविभागagricultureशेतीFarmerशेतकरी