लोकमत न्यूज नेटवर्क आसेगाव (वाशिम) : यंदाचा खरीप हंगाम शेतकºयांसाठी संकटांची मालिकाच घेऊन आला आहे. पावसाने धारण केलेले विचित्र रुप एका पाठोपाठा एक पिकांचे नुकसान करीत आहे. सुरुवातीला अतिपावसामुळे उडिद, मुग पिकाच्या शेंगांना कोंब फुटल्याने शेतकºयांचे नुकसान झाले असताना आता टंच भरलेल्या सोयाबीनच्या शेंगा सततच्या पावसामुळे भिजल्याने या शेंंगाला अंकूर फुटत असल्याचे चित्र आसेगाव परिसरात पाहायला मिळत आहे. यंदाच्या खरीप हंगामाची सुरुवातच शेतकºयांसाठी निराशाजनक ठरली. मृगाच्या पावसानंतर शेतकºयांनी पेरणी सुरू केली असताना निकृष्ट बियाण्यांनी घात केला. शेतकºयांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर आॅगस्टपासून पावसाने थैमान घातले. त्यात उडिद, मुग पिकाचे नुकसान झाले. या पिकाच्या शेंगांना अंकूर फुटले, तर आता सप्टेंबर महिन्यात पडत असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचून सोयाबीनच्या शेंगांनाही अंकूूर फुटू लागले आहेत. आसेगा येथील शेतकरी शेख. नदीम शेख. नबी, साजिद खान शमसेर खान, अब्दुल अन्सार शेख नबी, मोहम्मद खान इब्राहिम खान आणि शमशेर खान मुनीर खान आदि शेतकºयांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या शेतातील सोयाबीन पिकाच्या शेंगांना अंकूर फुटले आहेत. शेतकºयांच्या सर्व आशा या पिकावरच असताना आता या पिकाच्या शेंगांना अंकूर फुटल्याने यातून कोणतेच उत्पादन होयाची शक्यता उरली नाही. ही समस्या लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने या पिकाची पाहणी करावी आणि शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.
आता सोयाबीनच्या हिरव्या शेंगांना फुटले अंकूर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 15:33 IST