आता शिवशाही बसेसही सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:48 IST2021-09-05T04:48:01+5:302021-09-05T04:48:01+5:30

००००००००००००००० बसेसचे दरराेज सॅनिटायजेशन... कोरोना संसर्ग कमी झाला आहे; परंतु संपला नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनाही महत्त्वाच्या आहेत. सध्या शिवशाही ...

Now even Shivshahi buses are running smoothly | आता शिवशाही बसेसही सुसाट

आता शिवशाही बसेसही सुसाट

०००००००००००००००

बसेसचे दरराेज सॅनिटायजेशन...

कोरोना संसर्ग कमी झाला आहे; परंतु संपला नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनाही महत्त्वाच्या आहेत. सध्या शिवशाही बसेसचे नियमित सॅनिटायजेशन करण्यात येत आहे.

शिवशाही बस आगारात आल्यानंतर एअरप्रेशरने संपूर्ण बस निर्जंतूक केली जात आहे. बसेसमध्ये एसी सुरू राहत असल्याने विशेष काळजी या ठिकाणी घेण्यात येत आहे.

०००००००००००००००००००

या मार्गावर प्रतिसाद

जिल्ह्यातून सर्वाधिक शिवशाही बसेस या नागपूर आणि पुणेसाठी सोडण्यात येत आहेत. या मार्गावरील प्रवाशांचा समाधानकारक प्रतिसाद मिळत आहे.

वाशिम आणि रिसोड आगारातून नागपूर मार्गावर एकूण ७ शिवशाही बसेस सोडल्या जात आहेत. याच मार्गावर प्रवाशांचा समाधानकारक प्रतिसाद लाभत आहे.

०००००००००००००००

कोट: कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्याने शिवशाही बसेस सुरू केल्या आहेत. या बसेसना अपेक्षित असा प्रतिसाद प्रवाशांकडून मिळत नसला तरी पुढे प्रवासी हंगाम लक्षात घेऊन या बसेस कायम ठेवल्या जात आहेत.

- विनोद इलामे,

आगार व्यवस्थापक, वाशिम

०००००००००००००००००००

या मार्गावर सुरू आहेत शिवशाही बसेस

मार्ग बसेस

वाशिम-नागपूर - ३

रिसोड-नागपूर - २

रिसाेड - पुणे -२

कारंजा-अकोला -१

कारंजा-अमरावती -१

Web Title: Now even Shivshahi buses are running smoothly