शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शिकवणी वर्गांचे फायर आॅडिट  झालेच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 16:00 IST

नगर परिषदांनी कुठलाही विशेष पुढाकार न घेतल्याने एकाही शिकवणी वर्गाचे फायर आॅडिट अद्यापपर्यंत झालेले नाही.

- सुनील काकडे  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सुरत येथे २४ मे २०१९ रोजी एका बहुमजली शिकवणी वर्गाच्या इमारतीला लागलेल्या आगीत २२ विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला. यासारखी घटना वाशिम जिल्ह्यातही घडू शकते. त्यामुळे सर्व शिकवणी वर्गांचे फायर आॅडिट करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी २६ जून २०१९ ला दिले होते; मात्र नोटीस बजावण्यापुरता हा विषय मर्यादित असून, नगर परिषदांनी कुठलाही विशेष पुढाकार न घेतल्याने एकाही शिकवणी वर्गाचे फायर आॅडिट अद्यापपर्यंत झालेले नाही.वाशिम जिल्ह्यातील सहाही शहरांमध्ये दहावी ते बारावीच्या शिकवणी वर्गासह नीट, जेईई यासारख्या अभ्यासक्रमांचे शिकवणी वर्गही चालविले जातात. विद्यार्थ्यांच्या गर्दीने सदोदित भरून राहणाºया या शिकवणी वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्याची चांगली व्यवस्था, पिण्याचे शुद्ध पाणी, सुसज्ज स्वच्छतागृह असण्यासोबतच कधीकाळी आगीची घटना घडल्यास त्यावर तत्काळ नियंत्रण मिळविण्यासाठी शिकवणी वर्गाच्या परिसरात अग्निअवरोधक यंत्र लावलेले असणे गरजेचे आहे. याशिवाय इमारत परिसरात मोकळी जागा, संकटकालिन परिस्थितीत विद्यार्थ्यांना तत्काळ बाहेर पडता येण्यासाठी स्वतंत्र पायºया, मोकळा पार्किंग परिसर असणे अत्यावश्यक आहे. या सर्व सुविधा जिल्ह्यातील शिकवणी वर्गांमध्ये अस्तित्वात आहेत किंवा नाही, याची चाचपणी आणि फायर आॅडिट करण्याचे सक्त निर्देश जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी २६ जून २०१९ रोजी दिले होते.दरम्यान, जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मंगरूळपीर, कारंजा नगर परिषद आणि मालेगाव, मानोरा नगर पंचायतीने त्यांच्या कार्यक्षेत्रातील शिकवणी वर्गांना नोटीस बजावून फायर आॅडिट करून घ्यावे व त्याचा अहवाल एका महिण्यात सादर करावा, अशा सूचना दिल्या होत्या; मात्र हा विषय एवढ्यापुरताच मर्यादित राहिला असून प्रशासनाकडून ठोस पाठपुरावा झाल्याने शिकवणी वर्गांनीही त्याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्ह्यातील सर्व शिकवणी वर्गांचे विनाविलंब फायर आॅडिट करण्याचे निर्देश नगर परिषदांना देण्यात आले होते. त्याचे अहवाल सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. नगर परिषदांनी त्याची दखल घेतली किंवा नाही, याबाबतची माहिती घेतली जाईल. कुचराई झाल्यास मुख्याधिकाऱ्यांना नियमानुसार कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल.- ऋषीकेश मोडकजिल्हाधिकारी, वाशिम

शिकवणी वर्गांचे फायर आॅडिट करण्यासंबंधी जिल्हाधिकाºयांचे निर्देश प्राप्त झाले आहेत. त्याकडे निश्चितपणे दुर्लक्ष झाले; परंतु १५ आॅगस्टनंतर प्रभावी मोहीम हाती घेवून केवळ शिकवणी वर्गच नव्हे; तर व्यापारी संकुले, दवाखाने यासह नागरिकांची सदोदित वर्दळ असणाºया ठिकाणांचे फायर आॅडिट केले जाईल.- अशोक हेडानगराध्यक्ष, वाशिम

जिल्हाधिकाºयांच्या निर्देशानंतर रिसोड शहरातील सर्व शिकवणी वर्गांना फायर आॅडिट करण्यासंबंधी नोटिस देण्यात आल्या होत्या. त्याचे अहवाल सादर करण्यासाठी महिनाभराची मुदत देण्यात आली होती. ती आता संपली असून सर्व शिकवणी वर्गांचा मंगळवारपासून आढावा घेण्यात येणार आहे.- गणेश पांडेमुख्याधिकारी, रिसोड

टॅग्स :fireआगwashimवाशिम