शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्यांच्या हल्ल्यात रोहिचा मृत्यू; वनविभागच्या दिरंगाईमुळे प्राण गेल्याचा ग्रामस्थांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 16:25 IST

वाशिम :  मालेगाव तालुक्यातील ग्राम शिरसाळा येथे पाण्याच्या शोधात आलेल्या वन्यप्राण्यावर (रोही) कुत्र्यांनी हल्ला केल्याने त्यात तो प्राणी गंभीररित्या जखमी झाल्याची घटना ७ जून रोजी घडली.

- नंदकिशोर नारे  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  मालेगाव तालुक्यातील ग्राम शिरसाळा येथे पाण्याच्या शोधात आलेल्या वन्यप्राण्यावर (रोही) कुत्र्यांनी हल्ला केल्याने त्यात तो प्राणी गंभीररित्या जखमी झाल्याची घटना ७ जून रोजी घडली. गावकºयांना ही बाब कळताच त्यांनी मालेगाव वनविभागाला भ्रमणध्वनी करुनही ते वेळेवर न पोहचल्याने त्याचा जीव गेला असल्याचा आरोप शिरसाळावासियांनी केला आहे.शिरसाळा या गावात पाण्याच्या शोधात आलेल्या रोहीवर गावातीलच काही कुत्र्यांनी हल्ला करुन जखमी केल्याचे ग्रामस्थांना कळाल्याने त्याचा जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. काही ग्रामस्थांनी मालेगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, अधिकारी यांच्याशी संपर्कही साधला. तब्बल ५ तास उलटल्यानंतरही याची कोणीच दखल घेतली नाही. नागरिकांनी त्याला उचलून त्यांच्यापरिने उपचार करण्याचा प्रयत्न केला. पाच तासपर्यंत जीवंत असलेल्या रोहीवर वेळीच उपचार झाले असते तर त्याचा जीव नक्कीच वाचला असता असे ग्रामस्थांमध्ये बोलल्या जात आहे. यानंतर काही ग्रामस्थांनी वाशिमवनविभागाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क केला असता ती टिम ताबडतोब पोहचली परंतु कुत्र्यांनी रोहीला चांगलेच जखमी केल्याने त्याचे प्राण गेले होते. वनविभाागाच्या काही अधिकाºयांचे दुर्लक्ष, निष्काळजीपणामुळे एका वन्यप्राण्याला मात्र जीवाला मुकावे लागल्याची घटना ७ जून रोजी घडली.  यासंदर्भात मालेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी सिध्दार्थ वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता  घटनास्थळी आमचा स्टाफ होता. रोहीचा पाय तुटला होता.  रोहीचे शवविच्छेदन सद्यस्थितीत शिरपूर येथे सुरु असल्याचे सांगितले. मालेगाव वनपरिक्षेत्रातील अधिकारी कर्मचारी तेथे पोहचले होते का याबाबत विचारले असता त्यांनी वनविभागाचा स्टाफ होता मालेगावचा असो की वाशिमचा याने काय फरक पडतो असे सांगितले. यावरुन शिरसाळावासियांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याचे दिसून येते. याप्रकरणाची वरिष्ठांनी चौकशी करुन दोषी अधिकारी, कर्मचाºयांना जाब विचारणे गरजेचे झाले आहे.  रोही जखमी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मालेगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी यांन२२ी जायला पाहिजे होते परंतु त्यांची रात्रीची पेट्रोलिंग असल्याने वाशिमची टिम गेली होती. सकाळी ७ वाजता कळल्याबरोबर शिरपुटी येथील वनरक्षकास कळविले व तो ८ वाजता  घटनास्थळी पोहचला होता.  रोही रात्रीच्यावेळी खड्डयात पडला असावा त्यानंतर कुत्र्यांनी त्यावर हल्ला चढविला असावा, ही बाब सकाळी उघडकीस आली. वन्यप्राण्यावर हल्ला झाल्याने तो प्राणी शॉकमध्ये असल्याने मृत्यू झाला असावा. शेवटी मालेगावचे असो की वाशिमचे वनविभागाचे कर्मचारी घटनास्थही मात्र पोहचले होते.- सुमीत सोळंकेजिल्हा वनअधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमforest departmentवनविभागwildlifeवन्यजीव