शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

एनएचएम’ कर्मचाऱ्यांचे पुन्हा कामबंद आंदोलन;  वाशिम जिल्ह्यातील ३६४ कर्मचारी आंदोलनात सहभागी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 14:41 IST

वाशिम : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) कार्यरत कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या शासनस्तरावर बेदखल ठरल्यामुळे राज्यभरातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मंगळवार, ८ मे पासून पुन्हा कामबंद आंदोलन पुकारले आहे.

ठळक मुद्देआरोग्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही त्रिस्तरीय समिती स्थापनेबाबतचा शासन निर्णय अद्याप निघालेला नाही.एन.एच.एम.अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांच्या आर.आर.मध्ये बदल करून समायोजन करण्यात येईल, हे आश्वासनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कंत्राटी तत्वावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकवेळ कामबंद आंदोलनाचे हत्यार उगारले.

वाशिम : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) कार्यरत कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या शासनस्तरावर बेदखल ठरल्यामुळे राज्यभरातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मंगळवार, ८ मे पासून पुन्हा कामबंद आंदोलन पुकारले आहे. वाशिम जिल्ह्यातील ३६४ अधिकारी, कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्याची माहिती राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाचे वाशिम जिल्हाध्यक्ष महेंद्र साबळे यांनी दिली.आरोग्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही त्रिस्तरीय समिती स्थापनेबाबतचा शासन निर्णय अद्याप निघालेला नाही, संघटनेच्या अध्यक्ष व सचिवांचा निमंत्रित सदस्य म्हणून त्यात सहभाग व्हावा, ही मागणी अपूर्ण आहे. प्रथम सभा घेवून त्यात एन.एच.एम. अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी, कर्मचाºयांच्या समायोजनाच्या दृृष्टीने पुढील पदभरती (आरोग्य विभाग तसेच ग्रामविकास विभाग) थांबविण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. तसेच समिती स्थापनेपासून तीन महिन्याच्या कालावधीत एन.एच.एम.अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांच्या आर.आर.मध्ये बदल करून समायोजन करण्यात येईल, हे आश्वासनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या कंत्राटी तत्वावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकवेळ कामबंद आंदोलनाचे हत्यार उगारले असून या आंदोलनास ८ मे पासून प्रारंभ झाला. याअंतर्गत जिल्हा परिषदेसमोर पेन्डॉल टाकून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडला. 

जिल्हा परिषदेतील विभाग प्रमुखांना दिल्या जाणार घुगऱ्या!आंदोलनाचा एक भाग म्हणून ९ मे रोजी जिल्हा परिषदेसमोरील पेन्डॉलमध्ये चूलीवर घुगऱ्या शिजवून त्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत प्रत्येक विभागप्रमुखांना दिल्या जाणार आहेत. यामाध्यमातून शासनाच्या धोरणांप्रती संताप व्यक्त केला जाणार असल्याची माहिती महासंघाचे जिल्हाध्यक्ष साबळे यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमEmployeeकर्मचारीagitationआंदोलन