शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

नवे रोहित्र १० दिवसानंतरही मिळेना; शेतकरी वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 12:01 IST

MSEDCL NEWS अनेक ठिकाणी विद्युत रोहित्र नादुरुस्त, बंद असल्याने सिंचन करण्यात अडथळे येत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

ठळक मुद्देसद्य:स्थितीत जिल्ह्यात १६९ रोहित्र नादुरुस्त आहेत.तक्रार केल्यानंतर आठ दिवस रोहित्र मिळणे अपेक्षित आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम : यंदा प्रकल्प, धरणांमध्ये बऱ्यापैकी जलसाठा आहे; परंतु विद्युत रोहित्र नादुरुस्त असल्याने आणि बदलून मिळण्यास १०-१० दिवसांचा कालावधी लागत असल्याने सिंचनात व्यत्यय निर्माण होत आहे.यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागले. मूग, उडीद व सोयाबीन सोंगणी व काढणीच्या वेळी पाऊस आल्याने उत्पादनात प्रचंड घट आली होती. शेतकऱ्यांची सर्व भिस्त आता रब्बी हंगामातील पिकांवर आहे. पावसाळ्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने प्रकल्प, धरणांमध्ये मुबलक प्रमाणात जलसाठा आहे. दुसरीकडे अनेक ठिकाणी विद्युत रोहित्र नादुरुस्त, बंद असल्याने सिंचन करण्यात अडथळे येत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यात १६९ रोहित्र नादुरुस्त आहेत. यामध्ये ३३ केव्हीएचे २५, १०० केव्हीएचे ४१ आणि १६ केव्हीएच्या १०३ रोहित्रांचा समावेश आहे. रोहित्र बदलून मिळावे याकरिता शेतकरी हे लाइनमन व कनिष्ठ अभियंत्यांच्या माध्यमातून ‘फेलिअर रिपोर्ट’ महावितरणच्या संबंधित कार्यालयात सादर करतात. अनेक ठिकाणी १०-१० दिवस रोहित्र बदलून मिळत नसल्याने सिंचनात व्यत्यय निर्माण होत आहे. यंदा जिल्ह्यात ७२ हजार हेक्टरवर रब्बी पिकाची पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरणी हरभरा पिकाची ४८ हजार ७९१ हेक्टरवर झाली आहे.तक्रार करूनही प्रतीक्षेतच रोहित्र नादुरुस्त, बंद पडल्यानंतर लाइनमन किंवा कनिष्ठ अभियंत्यांकडे शेतकऱ्यांच्या वतीने तक्रार केली जाते. फेलिअर रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतरही १०, १० दिवस प्रतीक्षा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तक्रार केल्यानंतर आठ दिवस रोहित्र मिळणे अपेक्षित आहे.

शेतकऱ्यांना पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे पिकांचे नुकसानसिंचन करण्यासाठी रोहित्राशिवाय अन्य पर्यायी व्यवस्था नाही. रोहित्र जळाल्यानंतर १५-१५ दिवस सिंचन करता येत नाही. त्यामुळे पिके कोमेजून उत्पादनात घट येण्याची भीती शेतकरी वर्तवित आहेत.

विद्युत रोहित्र बंद किंवा नादुरूस्त असल्याची तक्रार आणि फेलिअर रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर लवकरात लवकर विद्युत रोहित्र बदलून दिले जात आहे. सद्यस्थितीत १६९ रोहित्र नादुरूस्त असून, ते बदलून देण्याची कार्यवाही सुरू आहे.- आर.जे. तायडे, कार्यकारी अभियंता, महावितरण

यंदा खरीप हंगामात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. मूग, उडीद व सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट आली. आता सर्व भिस्त रब्बी हंगामावर आहे. रोहित्र नादुरुस्त झाल्यानंतर १०-१० दिवस बदलून दिले जात नाही.- गाैतम भगत, शेतकरी

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरणFarmerशेतकरी