शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी २२.९९ कोटींच्या निधीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 14:46 IST

दुरुस्तीच्या १२८ कामांसाठी २९ कोटी ९९ लाख ५५ हजार रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

- दादाराव गायकवाड लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागांतर्गत येणाऱ्या सिंचन प्रकल्पांची क्षमता वाढवून शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करण्याची तयारी जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाने केली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील विविध प्रकल्पांचे बळकटीकरण आणि आवश्यक दुरुस्तीच्या १२८ कामांसाठी २९ कोटी ९९ लाख ५५ हजार रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.वाशिम जिल्ह्याची भौगोलिक स्थिती पाहता जिल्हा पठारावर वसलेला असल्यामुळे अस्त्विात असलेल्या प्रकल्पांव्यतिरिक्त नविन लघू, मध्यम वा मोठे प्रकल्प उभारण्यास वाव कमी आहे. त्यामुळे पूर्वी अस्तिवात असलेल्या प्रकल्प, योजनांची दुरुस्ती करून, त्यांचे बळकटीकरण करून पाणीसाठा व सिंचन क्षमता पुनरुजिव्वीत करणे आवश्यक आहे. त्यातच कुठे प्रकल्पांच्या गेटमध्ये बिघाड, कुठे भिंतीवर वाढलेले जंगल, तसेच इतर कारणांमुळे शेतकºयांना पुरेसे पाणी मिळण्यासह इतर अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा प्रकल्पांची विशेष दुरुस्ती व बळकटीकरण करण्यासाठी यापूर्वीही जि. प. जलसंधारण विभागाने प्रस्ताव तयार केला होता; परंतु अपुºया निधीमुळे कामे करता येऊ शकली नाहीत. आता विविध प्रकल्पांचे बळकटीकरण व विशेष दुरुस्तीसह इतर मिळून १२८ कामांसाठी जि.प. जलसंधारण विभागाने २८ फेब्रुवारी रोजी नव्याने २९ कोटी ९९ लाख ५५ हजार रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. यात प्रकल्पांच्या विशेष दुरुस्तीच्या ७५ कामांसाठी १३ कोटी १ लाख ५५ हजार झाडाझुडपे छाटणीसह इतर दुरुस्तीच्या २१ कामांसाठी ७४ लाख, सिंचन तलावाच्या वितरण प्रणालीचे बळकटीकरण करण्याच्या ७ कामांसाठी ८ कोटी ७४ लाख, तर साखळी, सिमेंट बंधारच्या २५ कामांसाठी ७ कोटी ५० लाख रुपयांच्या प्रस्तावाचा समावेश आहे.पालकमंत्र्यांसह जि.प. अध्यक्षांकडे प्रस्ताव सादरजिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या विशेष दुरुस्तीसह बळकटीकरण आणि इतर १२८ कामांसाठी लागणाºया २९ कोटी ९९ लाख ५५ हजार रुपयांचा प्रस्ताव जि.प. जलसंधारण विभागाच्यावतीने अमरावती विभागाच्या प्रादेशिक जलसंधारण अधिकाºयांसह जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरेयांच्याकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर निधी प्राप्त होताच ही कामे सुरू होणार आहेत.

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या सुचनेनुसार जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या विशेष दुरुस्तीसह बळकटीकरण व इतर १०५ कामांसाठी २९ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून प्रादेशिक जलसंधारण अधिकाºयांसह पालकमंत्री व जि. प. अध्यक्षांकडे सादर करण्यात आला आहे.-ए. एम. खान,जिल्हा जलसंधारण अधिकारीजि.प. जलसंधारण विभाग, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प