शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा, राज्य मार्गासह शहरातील रस्त्यावरील अतिक्रमणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 17:45 IST

मंगरुळपीर: शहरातून जाणारे जिल्हा आणि राज्य मार्गासह नागरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे.

ठळक मुद्देअतिक्रमण  नागरीकांसाठी त्रासदायक झाले असल्याने ते अतिक्रमण हटविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पावित्रा घेतला आहे. येत्या ७ फेब्रुवारीपर्यंत हे अतिक्रमण न हटविल्यास विविध संबंधीत शासकीय कार्यालयांच्या प्रवेशद्वारावर प्रतिकात्मक अतिक्रमण करून आंदोलन करण्याचा ईशारा.

मंगरुळपीर: शहरातून जाणारे जिल्हा आणि राज्य मार्गासह नागरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. हे अतिक्रमण  नागरीकांसाठी त्रासदायक झाले असल्याने ते अतिक्रमण हटविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पावित्रा घेतला आहे. येत्या ७ फेब्रुवारीपर्यंत हे अतिक्रमण न हटविल्यास विविध संबंधीत शासकीय कार्यालयांच्या प्रवेशद्वारावर प्रतिकात्मक अतिक्रमण करून आंदोलन करण्याचा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रशासनाला ३० जानेवारी रोजी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे, जि.प. उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांचे सह राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षºया आहेत.

 निवेदनात नमूद आहे की, शहरात शासकीय जागेवर तसेच शहरातून जाणाºया राज्य महामार्ग,नागरी रस्ते,नगर पालिकेच्या हद्दीत खुल्या शासकीय जागेवर दिसेल त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे.अतिक्रमण करण्याची मोहीम राजकीय कार्यकर्ते तथा असामाजिक तत्वाकडून राबविण्यात येत असल्याने शहरातील सर्व रस्ते अरुंद झाले आहेत. रस्ते वाहतुकीस योग्य नसल्याने नागरिकांना याचा त्रास होत आहे. शहराशिवाय शहरातून जाणाºया कारंजा,अकोला,मानोरा, वाशिम, मानोली रस्त्यावर अतिक्रमण धारकांची प्रचंड संख्या वाढली आहे. बांधकाम करून, लोखंडी शेड उभारून अतिक्रमण धारकांनी रस्ते व संपूर्ण शहराला वेढा घातला आहे. शाळा,महाविद्यालयास लागून पक्की अतिक्रमणे केल्याने विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून विद्यार्थिनींना चिडीमारीचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे एखादी अप्रिय घटना घडून कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही अतिक्रमणे ७ फेब्रुवारीपर्यंत हटविण्यात यावे, अन्यथा तहसील कार्यालय,पंचायत समिती,शासकीय विश्रामगृह,नगर परिषद कार्यालय,सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय यांच्या प्रवेश द्वारावर प्रतिकात्मक अतिक्रमण करून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे, जि.प. उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, राकाँचे तालुका अध्यक्ष आर. के.  राठोड, माजी पं.स. सभापती भास्कर पाटील ,अरुणकुमार इंगळे,रमेश नावंधर,पं स सदस्य शेरुभाई फकिरावाले,वनिता चव्हाण,अनुसया डाहाने,मधुकर भगत,रमेश मुंजे,देवराव डाहाने, विष्णू  चव्हाण,युनूस खान,दगडू नाईक,विश्वनाथ आटपडकर,बबनराव ठाकरे,साबीर फकिरावाले, किशोर वडते, उमेश मुंजे,प्रतिभाताई महल्ले,देवराव महल्ले,उत्तमराव इंगोले,महादेव ठाकरे यांचेसह शेकडो कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक,उपविभागीय अधिकारी,तहसीलदार,ठाणेदार,पालिका मुख्याधिकारी,बांधकाम विभाग, पं स गटविकास अधिकारी आदींना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिमNCPराष्ट्रवादी काँग्रेस